श्रीरामपूर येथील केमिकल कंपनीत भीषण आग

श्रीरामपूर – लाईव्ह ट्रेंडस न्युज वृत्तसेवा । अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूरमध्ये एका केमिकल कंपनीला भीषण आग लागल्याची घटना घडली असून आग कशामुळे लागली याचे  कारण अद्याप अस्पष्ट आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, श्रीरामपूरमधील एमआयडीसीमध्ये  एका केमिकल कंपनीला आज दुपारच्या सुमारास आग लागली. आग कशामुळे लागली याचे  कारण अद्याप अस्पष्ट आहे. या घटनेत अद्याप कोणतीही जीवितहानी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. आग मोठ्या प्रमाणात पसरली असून संपूर्ण कंपनी आगीच्या भक्षस्थानी सापडली आहे. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या असून आग विझवण्याचे काम सुरू आहे.

आगीने प्रचंड रौद्ररुपधारण केले असून संपूर्ण कंपनी आगीच्या भक्षस्थानी सापडली आहे. धुराचे लोट दूरपर्यंत दिसून येत आहे. आग लागल्यानंतर स्फोटांचेही आवाज येत आहे. या आगीमध्ये कंपनीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी श्रीरामपूर, लोणी, राहता येथील अग्निशमक दल दाखल झाले आहे. आग आटोक्यात आणण्याचा युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहे.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!