यावल शहरासह तालुक्यात चैतन्यदायी वातावरणात नवदुर्गा विसर्जन

 

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | शहरासह तालुक्यातील नवदुर्गा विसर्जन रात्री उशीरापर्यंत शांततेत पार पडले.

येथील यावल शहरातील ४० तर पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात असलेल्या ग्रामीण भागातील३०अशा ७० सार्वजनिक दुर्गोत्सव मंडळाच्या वतीने गुरुवारी दिनांक २६ ऑक्टोबर गुरुवार रोजी पारंपारिक वाद्य वृंदाच्या गजरात बेधुंद नृत्य करीत युवा वर्गाने निरोप दिला आहे.सायंकाळ पासून मोठ्या उत्साहाच्या व शांततेच्या वातावरणात विसर्जन मिरवणुकींना सुरवात होत,रात्री उशिरा पर्यंत तापी नदीच्या पात्रात नवदुर्गाचे विसर्जन करण्यात येत होते.

यावल शहरातील ४० दुर्गोत्सव मंडळांनी नवदुर्गोत्सव साजरा केला या सार्वजनिक मंडळांसह तालुक्यातील नायगाव, किनगाव, शिरसाड,थोरगव्हाण,मनवेल,मालोद, सावखेडा सिम,कोरपावली,वड्री, बोराळे,बोरावल खुर्द आदी गावातील मंडळांनीनवरात्रीउत्सवाची कायद्या सुव्यसस्थेचे पालन करीत उत्साहात सांगता केली.

नवरात्रीउत्सव काळात उत्साहात आई दुर्गेची आराधाना,पुजा,गरबा, दांडीया उत्साहात पार पडली. दरवर्षी विजयादशमीचे दुसरे दिवशी होणारे विसर्जन यावर्षी बुधवार आल्याने व बुधवारी देवीचे विसर्जन करत नसल्याची परंपरा असल्याने तालुक्यातील बहुतांश गावांमध्ये गुरुवारी हे विसर्जन करण्यात आले. विसर्जन शांततेत व उत्साहात व्हावे यासाठी येथील पोलीस ठाण्याच्या वतीने मंडळाचे पदाधिकारी शांतता कमिटी सदस्य व संबंधित प्रशासन यांची संयुक्त बैठक घेण्यात आली होती.त्यानुसार विसर्जन मिरवणुकी दरम्यान शांतता समिती सदस्य , राजकीय पक्षाचे पदाधिकारी यांचे सहकार्य लाभले.

फैजपुर विभागाचे पोलीस अधिकारी डॉ. कुणाल सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरिक्षक राकेश मानगावकर, सहाय्यक पोलीस निरिक्षक विनोदकुमार गोसावी, पोलीस उपनिरिक्षक अविनाश दहिफळे, पोलीस उपनिरिक्षक सुनिल मोरे, पोलिस उपनिरिक्षक मुजफ्फर खान पठान यांच्यासह सहाय्यक फौजदार विजय पाचपोळे, सहाय्यक फौजदार असलम खान, सहाय्यक फौजदार नितिन चव्हाण व त्यांच्या सहकारी पोलिस कर्मचारी तसेच गृहरक्षक दलाच्या कर्मचारी यांनी आपला बंदोबस्त रोख राखला आहे. शहरातील प्रमुख मार्गाने रात्री उशिरा पर्यंत मिरवणुक सुरू होती. सर्वत्र शांततेत विसर्जन पार पडले.

Protected Content