यावल तालुक्यात वादळी पावसाने नुकसान

yaval heavy rain

यावल प्रतिनिधी । तालुक्यातील सांगवी बुद्रुक व डोंगर कठोरासह परिसरात आज झालेल्या वादळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

सांगवी बुद्रुक गावामध्ये झाडे कोसळून काही घरांचे नुकसान झाले असुन, जिल्हा परिषद शाळेची पोषण आहाराची खोली दाबली गेली आहे. वादळामुळे घरावरील पत्रे उडाले गावाजवळील परिसरातील केळी बागांचे नुकसान झाले आहे. ग्रामस्थांच्या प्रसंगावधानामुळे काही लोकांचे वाचले. तर डोंगर कठोरा गावात देखील अर्धा तास चाललेल्या वादळी पावसामुळे नुकसान झाले आहे. यामध्ये भिल्ल वाड्यातील तीन घरांवर झाड कोसळल्याने घरातील संसारोपयोगी वस्तु दाबल्या गेल्या आहेत. त्यामुळे या तीन कुटुंबांचा संसार उघड्यावर आला आहे. या वादळात किशोर माधव भिल्ल, पिंटु गुलाब भिल्ल, अनिल गोरख भिल्ल या तिन आदीवासी कुटुंबियांची घरे जमीनदोस्त झाली आहेत. वादळाच्या वेळी किशोर भिल्ल यांची पत्नी राधा व त्यांची तीन मुले घरातच होती. मात्र त्यांना ग्रामस्थांच्या मदतीने प्रसंगावधानामुळे तात्काळ बाहेर काढण्यात आले त्यामुळे त्यांचे जीव वाचले. या वादळामुळे गावातील वीजपुरवठा काही तास खंडित झाला होता. याशिवाय तडवी वाड्यातील देखील काही घरावर झाडे कोसळून घरातील सामानाचे नुकसान झाले आहे. बाहेरील कोळीवाड्यातील चावदस सिताराम कोळी यांच्या गुरांच्या गोठ्यावर झाड पडून गोठा दाबला गेला. जिल्हा परिषद मुलींच्या शाळेतील पोषण आहारखोलीचे देखील झाड कोसळून खोलीतील सामानाचे नुकसान झाले आहे.

दरम्यान, या वादळी पावसामुळे शरद एकनाथ पाटील, डॉ. नरेंद्र सिताराम पाटील यांच्याशिवाय इतर शेतकर्‍यांच्या केळी बागांचे नुकसान झाले आहे. गावातील अनेक घरांवरील पत्रे उडाली आहेत. सरपंच सुमनबाई वाघ उपसरपंच विकास धांड,े भालचंद्र भंगाळे, डॉक्टर नरेंद्र पाटील, शशिकांत मेघे, दिलीप धनगर राजू तडवी व ग्रामस्थांच्या उपस्थित तलाठी शरद पाटील यांनी नुकसानीची पाहणी केल्याचे वृत्त आहे.

Add Comment

Protected Content