फैजपूर प्रतिनिधी । शहरातील नवीन सब स्टेशनची निर्मिती झाल्यापासून वीज पुरवठा हा गेल्या १५-२० दिवसापासून वारंवार खंडित होत असल्याने नागरिक त्रस्त झाले असून वीज पुरवठा सुरळीत व्हावा, अशा मागणी फैजपूर भाजपतर्फे महावितरणाला निवेदनाव्दारे करण्यात आली. येत्या दोन दिवसात तक्रार निवारण न झाल्यास भाजपाकडून आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला आहे.
यामुळे शहरातील उद्योगधंद्यांना मोठा बाधा निर्माण होत असून तर सर्वसामान्य तसेच शेतकरी बंधूंचे का मागण्यांचे दिवस असून दिवसभर शेतकरी शेतात काम करीत असून रात्री त्यांच्या स्वयंपाक जेवणाच्या व झोपेच्या ऐनवेळी लाईट बंद झाल्यामुळे त्यांची झोप उडाली आहे. तसेच रात्रीच्या अवेळी होणारा विद्युत पुरवठा बंद होत असल्याने मोठ्या प्रमाणात चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे.
या बाबी भाजपाकडून व शहरवासीयांना कडून महावितरण अधिकाऱ्यांची वेळोवेळी संपर्क केला असता गेल्या पंधरा दिवसापासून या तक्रारीकडे दखल न घेतल्यामुळे माजी नगराध्यक्ष निलेश राणे यांच्या नेतृत्वाखाली फैजपूर भाजपाने या बाबी महावितरणच्या ग्रामीण कार्यालयामध्ये विद्युत अधिकारी फिरके ,कनिष्ठ अभियंता सरोदे यांच्याशी या बाबी चर्चा करून निवेदन सादर केले आहे.
या निवेदनात उल्लेख करण्यात आला आहे की महावितरण जर विद्युत बिल भरण्यास विलंब झाला असत त्याचे दंड आकारते मात्र गेल्या पंधरा दिवसापासून विद्युत खंडित होत असल्याने उद्योगधंद्यांचे आर्थिक नुकसान होत आहे यामुळे व्यापारी शहरवासीयांना मानसिक त्रासाला सामोरे जावे लागले आहे. यास महावितरणचा गलथानपणा कारणीभूत असल्याचे म्हटले आहे. सदर विषय येत्या दोन दिवसात तक्रार निवारण न झाल्यास भाजपाकडून आंदोलन करण्यात येऊन ग्राहकांना विद्युत बिले न भरण्याचा इशारा देण्यात येणार आहे.
याप्रसंगी माजी नगराध्यक्ष निलेश राणे, तालुका उपाध्यक्ष नितीन नेमाडे, जयदीप राणे, भाजपा शहराध्यक्ष अनंता नेहेते, संजय सराफ, पिंटू भाऊ तेली, नरेंद्र चौधरी ,रितेश चौधरी, हरीश होले ,भरत कोल्हे आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.