यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । आगामी काळात होउन घातलेल्या सार्वत्रिक विधानसभा व लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर निवडणुक आयोगाच्या वतीने १ जानेवारी २०२४ पर्यंत ज्या तरूण व तरुणींचे वय १८ वर्ष पुर्ण होणार आहे अशा नागरीकांचे नवमतदार नोंदणी मोहीमेत सहभागी करून घेत त्यांना मतदानाचा हक्क प्राप्त करून देण्यासाठी प्रशासन सज्ज झाले असुन यासाठी सातपुडा पर्वताच्या अतिदुर्गम क्षेत्रातील आदीवासी वस्तीवर यावलच्या तहसीलदार मोहनमाला नाझीरकर पोहचल्या होत्या. नव मतदार नोंदणी आणि दुरूस्तीची मोहीम राबविण्यासाठी गेल्या. या प्रसंगी त्यांनी आदिवासी समाजाच्या अडीअडचणी जाणून घेतल्या.
यावल महसुल प्रशासनाच्या निवडणुक शाखेच्या वतीने संपुर्ण तालुक्यात विविध गावांमध्ये १ जानेवारी २o२४ पर्यंत १८ वर्ष पुर्ण झालेल्या तरुणी व तरुणांची नव मतदार नोंदणी अभियानास सुरुवात झाली असुन या मतदार नोंदणी मोहीमची शेवटची मुदत ९ डिसेंबर २०२३ करण्यात आली आहे, यावलच्या तहसीलदार मोहनमाला नाझीरकर यानी दिनांक २६ आणि २७ रोजी आपल्या महसुलच्या पथकाकडुन यावल तालुक्यातील सातपुडा पर्वताच्या क्षेत्रातील अतिदुर्गम भागातील चार गावे जामण्या, गाडऱ्या, उसमळी, लंगडा अंबा येथे नवीन मतदार नोंदणी साठीचे अर्ज भरून मयत झालेली मतदारांची नावे कमी करण्याकरिता संबधीत कुटुंबाकडून अर्ज भरून घेण्यात आलीत ,यावेळी तहसीलदार मोहनमाला नाझिरकर यांच्या सोबत तलाठी टी