पैशांवरून तरुणाला फायटरने मारहाण

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील पिंप्राळा हुडको परिसरात उसनवारीचे पैसे मागण्याच्या कारणावरून एका तरुणाला तीन जणांनी फायटरने मारहाण करून गंभीर दुखापत केली, तसेच त्याच्या आई आणि बहीण यांना शिवीगाळ करत जीवेठार मारण्याची धमकी धमकी दिल्याचा प्रकार बुधवार २९ नोव्हेंबर रोजी सकाळी ६ वाजता वाजता घडली आहे. याप्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात रात्री ११ वाजता रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, रहेमान खान करीम खान (वय-२५), रा. पिंप्राळा हुडको, जळगाव हा तरुण आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. हात मजुरीचे काम करून तो आपला उदरनिर्वाह करतो. बुधवार २९ नोव्हेंबर रोजी सकाळी ६ वाजता उसनवारीचे पैसे मागण्याच्या कारणावरून रहेमान खान या तरुणाला त्याच परिसरात राहणारे नईम शेख आणि त्याची पत्नी आणी त्याचा मुलगा सादिक नईम शेख अशा ३ जणांनी फायटरने तरुणाच्या डोक्याला मारहाण करून दुखापत केली. त्यानंतर रहेमान खान याच्या आई आणि बहीण या दोघांना देखील शिवीगाळ करत जीवेठार मारण्याची धमकी दिली. जखमी झालेल्या रहेमान खान याला तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. दरम्यान रात्री ११ वाजता रहमान खान यांनी दिलेल्या फिर्यादीवरून रामानंदनगर पोलीस ठाण्यात नईम शेख व त्याची पत्नी आणि त्याचा मुलगा सादिक नईम शेख सर्व रा. पिंप्राळा हुडको, या तिघांवर रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल हर्षल पाटील करीत आहे.

Protected Content