चोपडा येथे सेंद्रिय हापूस आंबा महोत्सवाला प्रतिसाद

b9e0e3df 3e22 4ece b083 35d375dd38f2

चोपडा (प्रतिनिधी) पूर्वीच्या काळी शेतकऱ्यांची परिस्थिती बिकट झाली तर बांधावर लावलेल्या आंब्याच्या झाडामुळे त्याला जीवनदान मिळायचे, म्हणून पूर्वीचे लोक सांगत की, शेतकऱ्यांचा मदतीला आंब्याचे झाड येत असते. असे प्रतिपादन माजी विधानसभा अध्यक्ष अरुणभाई गुजराथी यांनी आज येथे केले.

 

चोपडा पिपल्स को ऑफ बँक सार्वजनिक सेवा ट्रस्टतर्फे आज (दि.१७) सकाळी १०.०० वाजता येथील बोथरा मंगल कार्यालयात भव्य सेंद्रिय हापूस आंबा महोत्सव घेण्यात आला, त्यावेळी ते उद्घाटक म्हणून बोलत होते. यावेळी व्यासपीठावर रत्नागिरीचे प्रगतिशील शेतकरी राजेश पालेकर, जळगावचे काजू व्यापारी राहुल मणियार, नगराध्यक्षा सौ. मानिषा चौधरी, राष्ट्रवादीच्या सौ. माधुरी पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे जगन पाटील, चोसाकाचे माजी चेअरमन घनश्याम पाटील, ट्रस्टचे उपाध्यक्ष मोरेश्वर देसाई, संचालक प्रविण गुजराथी, सामाजिक कार्यकर्त्या सौ. सविता जाधव, राजेंद्र भाटिया आदी उपस्थित होते.

यावेळी रत्नागिरीचे शेतकरी राजेश पालेकरं यांनी आपल्या भाषणात सांगितले की, सेंद्रिय खतापासूनच पिके पिकवली गेली पाहिजेत. भारतात सर्वात जास्त केमिकल्स वापरणारे पंजाब राज्य असून आणि सर्वात जास्त सेंद्रिय खत वापरणारे राज्य मिझोरम हे आहे. अजूनही १६ राज्यात हापूस आंबा माहितच नाही, ही शोकांतिका आहे. एकवेळ कमी उत्पन्न आले तरी चालेल, पण आपण विषारी उत्पादन देऊ नका, असा मौलिक सल्लाही त्यांनी दिला यावेळी दिला. कार्यक्रमाचे प्रस्ताविक ट्रस्टचे अध्यक्ष चंद्रहास गुजराथी यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रविण गुजराथी यांनी केले. यावेळी अनेक संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.

 

Add Comment

Protected Content