स्रियांचा आदर करीत त्यांना सन्मान द्या – प्राजक्ता गायकवाड

अमळनेर – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | महाराष्ट्राला थोर आणि महान स्त्रियांचा ऐतिहासिक वारसा लाभला आहे. त्यांचे व्यक्तिमत्व आणि संस्कार यांचा विचार अंमलात आणून स्रियांना सन्मान द्या असे आवाहन प्राजक्ता गायकवाड  यांनी केले.

 

राजमुद्रा फाउंडेशन ‘जागर स्त्री शक्तीचा’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.  यात नवरात्रौउत्सवानिमित्त  घेण्यात आलेल्या  विविध स्पर्धांचा बक्षीस वितरण सोहळ्यासं स्वराज्य रक्षक मालिकेतील महाराणी येशूबाई यांची भूमिका साकारलेल्या प्राजक्ता गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती.  याप्रसंगी व्यासपीठावर माजी आमदार कृषीभूषण साहेबराव पाटील, धुळे येथील शिवाजी विद्या प्रसारक च्या संचालिका अश्विनी पाटील, जिल्हा परिषदेच्या सदस्या जयश्री पाटील, खान्देश शिक्षण मंडळाचे संचालक विनोद भैय्या पाटील, बाजार समितीच्या मुख्य प्रशासक तिलोत्तमा पाटील, मारवड ग्राम विकास शिक्षण मंडळाचे अद्यक्ष जयवंतराव पाटील, अमळनेर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी प्रशांत सरोदे, संभाजी बिग्रेडचे जिल्हाद्यक्ष तुषार सावंत, महानगराद्यक्ष संदीप पाटील, के. डी. पाटील, किरण सूर्यवंशी, राजश्री पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

प्राजक्ता गायकवाड पुढे म्हणाल्या की, उंबराच्या आतील आणि बाहेरील जबाबदारी महिला उत्तम सांभाळते. एकविसाव्या शतकात स्त्री ही सामर्थ्यवान असूनही दररोज आपल्याला बऱ्याच वाईट घटना ऐकाव्या लागतात, पहाव्या लागतात. त्यासाठी स्रियाना राजमाता  जिजाऊ, महाराणी येशूबाई, महाराणी ताराबाई, सावीत्रीबाई फुले, सिंधुताई सपकाळ यांच्यासारखे धाडसी आणि संयमी व्हावे लागेल.

यावेळी नवरात्रौउत्सव मध्ये  राजमुद्रा फॉउंडेशनचे अध्यक्ष श्याम पाटील व महाराणी येशूबाई बचत गटाच्या अध्यक्षा आरती श्याम पाटील यांनी स्त्री शक्तीचा जागर या कार्यक्रमात गेल्या सात दिवसात झालेल्या विविध स्पर्धा यांचे बक्षीसे प्राजक्ता गायकवाड यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.

यावेळी माजी आमदार कृषीभूषण साहेबराव पाटील, शिवाजी विद्या प्रसारकच्या संचालिका आश्विनी पाटील, जिल्हा परिषदेच्या सदस्या जयश्री पाटील यांनी मनोगत व्यक्त केले.

बक्षीस वाटप आणि सत्कार —–

यावेळी श्याम पाटील यांनी नीट परीक्षेतील गुणवंत विद्यार्थी यांच्या सत्कार केला. तर स्त्री शक्तीचा जागर या कार्यक्रमाअंतर्गत मुली आणि महिला वर्ग यांनी सहभाग घेतला होता. यात त्यांना पैठणी, सोन्याची नथ, चांदीची राजमुद्रा आदी बक्षिसांचे वाटप करण्यात आले.  या विविध स्पर्धाचे पर्यवेक्षिका म्हणून प्रा. मोनाली पाटील, शितल सुमित सूर्यवंशी, प्रा. विशाखा पाटील यांनी काम पाहिले.

यात मुक्ता विनोद खैरनार, आश्विनी रविद्र साळुंखे, पुनश्री संतोष चौधरी, नेहा नितीन पाटील, करुणा वानखेडे, प्रियंका राजू सोनी, प्रिया भानुदास पाटील, पायल पाटील, स्वेता ठाकरे, मोनिका दावणारी, जिया बेदाणी, पायल वसंत कोळी, अनिता विजय भदाणे, अनुष्का शशिकांत पाटील आदीना बक्षीस वाटप करण्यात आले.

 

महाराणी येशूबाई बचत गटाचे कार्य कौतुकास्पद

बचत गटाला महाराणी  येशूबाई बचत गट नाव दिले असून त्यांप्रमाणेच तुमचे कार्य सुरु आहे. महिलांना एक उत्कृष्ट  संधी अशा कार्यक्रमातून उपलब्ध करून  दिली असल्याचे यावेळी प्राजक्ता गायकवाड यांनी सांगितले. तर  श्याम  पाटील यांनीही सामाजिक उपक्रमातून वेगवेगळ्या संकल्पना राबवीत श्याम पाटील यांच्या उपक्रमाचे कौतुकही प्राजक्ता गायकवाड, माजी आमदार कृषिभुषण साहेबराव पाटील यांनी केले.

 

महिलांची लक्षणीय उपस्थिती 

गेल्या सात दिवसांपासुन स्त्री शक्तीचा जागर या कार्यक्रमातून श्याम पाटील व त्यांच्या टीमने महिलांसाठी वेगवेगळ्या स्पर्धा आयोजित केल्या होत्या. यामुळे त्यांच्या सुप्त कला गुणांना वाव मिळाल्याने महिला वर्गात आंनदी वातावरण होते.

यातच स्वराज्य रक्षक मालिकेतील महाराणी येशूबाई यांची भूमिका साकरलेल्या प्राजक्ता गायकवाड या अमळनेर नगरीत आल्याने त्यांना पाहण्यासाठी महिलावर्ग मोठ्या संख्येत उपस्थित होत्या.

 

प्राजक्ता गायकवाड यांचा रोड शो 

अमळनेर तहसील कार्यालयाच्या राजमाता प्रवेश द्वारापासून ढेकू रोडवर  जीपवरून त्यांचा रोड शो काढण्यात आला. यावेळी जीपच्या पुढे डी जे वाद्य आणि मोटार सायकल रॅली यामुळे आगळे वेगळे स्वरूप या कार्यक्रमाला लाभले होते. याप्रसंगी शहरातील तरुण मंडळी यांनी डी जे च्या तालावर ठेका धरित एकच जल्लोष केला होता.

 

Protected Content