यंदापासूनच मराठा विद्यार्थ्यांना मिळणार वैद्यकीय प्रवेशात आरक्षण

maratha aarkashan

मुंबई (वृत्तसेवा): मुंबई उच्च न्यायालयाकडून मराठा विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. वैद्यकीय प्रवेशात यंदापासूनच मराठा आरक्षण देण्यास विरोध करणारी याचिका उच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. त्यामुळे मराठा समाजातील विद्यार्थ्यांना वैद्यकीय प्रवेशात यंदापासूनच आरक्षण मिळणार आहे.

एमबीबीएस प्रवेशासाठी यंदाच्या वर्षी आरक्षण कायदा लागू करण्यास विरोध करणारी याचिका आज कोर्टात दाखल करण्यात आली होती. मात्र एसबीई अंतर्गत कोर्टाने ही याचिका फेटाळून लावली. ‘प्रवेशप्रक्रिया आधी सुरू झाली असली तरी आरक्षण हे प्रवेश देतानाच लागू होते’, हा राज्य सरकारचा दावा स्वीकारत याचिका फेटाळून लावली. त्यामुळे यंदापासूनच वैद्यकीय प्रवेशात आरक्षण लागू होणार असल्याने मराठा विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. वैद्यकीय प्रवेश प्रक्रिया १ नोव्हेंबर २०१८ पासून सुरू करण्यात आली. प्रवेश प्रक्रिया सुरू केल्यानंतर राज्य सरकारकडून एसईबीसी कायद्याला मंजुरी देण्यात आली. वैद्यकीय प्रवेशादरम्यान सुरू शैक्षणिक वर्षापासून एसईबीसी कायद्यानुसार प्रवेश दिला जाणार नसल्याचे आश्वासन राज्य सरकारने दिले होते, असे विरोधात दाखल करण्यात आलेल्या याचिकेत नमूद करण्यात आले होते.

Protected Content