धरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । धरणगाव शहरातील ग्रामीण रूग्णालयाच्या बाजूला आलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये कत्तलीच्या उद्देशाने बांधलेले चार गोऱ्हे मिळून आले आहे. याप्रकरणी बुधवारी २९ मे रोजी दुपारी साडेचार वाजता धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक असे की, धरणगाव ग्रामीण रूग्णालयाच्या बाजूला असलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये काही गुरांना कत्तलीसाठी घेवून जाण्याच्या उद्देशाने बांधून ठेवले असल्याची माहिती धरणगाव पोलीसांना मिळाली. त्यानुसार पोलीसांनी बुधवार २९ मे रोजी दुपारी २ वाजता कारवाई केली असता राजेंद्र हिरामण धनगर वय ३९ रा. धनगर गल्ली, धरागाव याने पत्र्याच्या शेडमध्ये चार गोऱ्हे बांधलेल्या आवस्थेत दिसून आले. दरम्यान, राजेंद्र धनगर याची चौकशी केली असता विनापरवाना कत्तलीसाठी घेवून जात असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलीसांनी कारवाई करत चारही गोऱ्हे ताब्यात घेतले. तर पोकॉ विनोद संदानशिव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दुपारी साडेचार वाजता धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ महेंद्र पाटील हे करीत आहे.