नगरपालिकेसमोरील ईलेक्ट्रीक व रिवायडींगची दुकाने फोडली

धरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील नगरपालिकेसमोरील ईलेक्ट्रीक व रिवाईंडींगचे एकुण ३ दुकाने फोडून अज्ञात चोरट्यांनी दुकानातून ताब्याचे तार, कॉपर कॉईल असा एकुण ६७ हजार ५०० रूपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना उघडकीला आले आहे. याप्रकरणी धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीसांनी दिलेली माहिती अशी की, धरणगाव शहरातील नगरपालिका समोर काही ईलेक्ट्रीक दुकाने आहे. यातील ३ ईलेक्ट्रीक दुकाने फोडून ताब्यांच्या तारांची चोरी केल्याची घटना गुरूवार ७ मार्च रोजी सकाळी ८ वाजता समोर आली आहे. यात रेणूका मशनरी व रिपेअरींग रिवायडींग दुकानातून ३० हजार रूपये किंमतीचे ताब्यांचे तार, हितेश ईलक्ट्रीक दुकानातून ३० हजार रूपये किंमतीचे कॉपर कॉईल्स, रॉयल ईलक्ट्रीक दुकानातून ७ हजार ५०० रूपयांचे तांब्याच्या तारांची चोरी असा एकुण ६७ हजार ५०० रूपये किंमतीचा मुद्देमाल चोरून नेला आहे. दरम्यान ही घटना उघडकीला आल्यानंतर दुकानदारांनी धरणगाव पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरोधात सकाळी ११.३० वाजता धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक जिभाऊ पाटील हे करीत आहे.

Protected Content