यावल प्रतिनिधी । तालुक्यातील अनुदानीत व बिनाअनुदानीत रॉकेल पुरवठा सुरू करण्यात यावा, अशी मागणी करत आज दि.3 ऑगस्ट रोजी सर्व अर्धघावुक व किरकोळ रॉकेल व्यवसायिकांनी निवासी नायब तहसीलदार आर.के. पवार यांना निवेदन दिले आहे.
या निवेदनात दिलेल्यानुसार, तालुक्यातील अर्धघावुक व किरकोळ / हॉकर्स रॉकेल व्यवसायिकांनी म्हटले आहे की, तालुक्यातील जवळपास सर्वच गावे ही दुष्काळ सदृश्य व अतिदुर्गम भागातील असुन अनेक गावांमध्ये दारिद्री व बेरोजगारी असल्याने सर्वसामान्य लोक हे मजुरी करून आपला उदरनिर्वाह करीत असतात. ऑक्टोबर २०१८ पासुन शासनाने जळगाव जिल्हा रॉकेल मुक्त केला आहे. त्यामुळे या गरीब लोकांना रॉकेल मिळत नाही. शिवाय सर्वाच गावापर्यंत एल.पी.जी गॅस नेण्यासाठी साधन उपलब्ध होत नाही. त्यामुळे या ग्रामीण व आतिदुर्गम भागातील लोकांना गॅसबरोबर रॉकेल पुराविण्याची गरज आहे. त्याचप्रमाणे रॉकेलपुरवठा बंद झाल्यापासुन काहीजणांकडे साधन नसल्याने कुटंबाला उदरनिर्वाह करणे शक्य होत नाही.
त्याचप्रमाणे विनाअनुदानीत रॉकेलचा भाव ७१.५०, १८ टक्के जीएसटी व वाहतुक असा मिळुन जवळ जवळ ७१.५ रुपये खर्च घाऊक डेपो पर्यंत पडते. यात अर्धघावुक कमिशन अधिक किरकोळ विक्रेते कमिशन अधिक येणारा खर्च असे जवळपास ८१रुपये लिटर व १ लिटर रॉकेलचा दर सामाज्ञ माणसाला परवडणारा नाही. तरी शासनाने जनतेला स्वयंपाक गॅस उपलब्ध करून दिला असला तरी अतिदुर्गम भागातील आदीवासी कुटुंबांना रॉकेल पुर्ण भावात परवडणारा नाही. तरी दिवाळी, अत्यंसंस्कार, व स्टोव्ह वापरासाठी रॉकेलची गरज भासत असते, शासनाने अनुदानीत रॉकेल देत नसेल तर विनाअनुदानीत रॉकेलचा दर जनतेला जास्ती-जास्त ४० ते ४५ रुपये दराने उपलब्ध करून द्यावे. शासनाने ५ टक्के जिएसटी सह अनुदानित रॉकेल २८ रुपये लिटर१४ (५० टक्के) अनुदान अंदाजे ४३ रुपये लिटर भावाने विनाअनुदानीत रॉकेल उपल्बध करून मिळावे. तसेच रॉकेल व्यवसायीकांना शेकडा टक्केवारीने कमिशन द्यावे. अशी मागणी निवेदनाव्दारे करण्यात येत आहे.
या निवेदनावर योगेश जैन, मे. माहुरकर ब्रदर्स, शेख ब्रदर्स, सचिन तेली, अर्चना पाटील, डी.आर. दांडगे, महेश ठाणावाला, भालोद सोसायटी, बामणोद सोसायटी, शरीफ ॲड कंपनी, आर.आय.सैय्यद, नरेंद्र नेवे, अर्जुन सोनार, कल्पना रावते, विनोद चौधरी, प्रमिला तेली, रज्जाक ईस्माईल शाह, रियाज खान युसुफ खान, प्रकाश अजमेरा, दिलीप नेवे, शाहनाज मो. हनीफ, सलीम शेख ईस्माइल, आबीद खान साबीर खान, सुभाष दांडगे, मोरेश्वर किरंगे, भावलाल कोळी, नवलदास बैरागी यांच्यासह अन्य विक्रेत्यांच्या स्वाक्षरीचे निवेदन निवासी नायब तहसीलदार आर.के.पवार यांना देण्यात आले आहे.