चोपडा प्रतिनिधी । येथील यशोधन चॕरिटेबल ट्रस्ट संचलीत ऑर्किड इंटरनॅशनल स्कूलमध्ये आज २६ जानेवारी प्रजासत्ताक दिन ऑनलाईन पध्दतीने साजरा करण्यात आला.
संस्थेच्या सदस्या डॉ. तृप्ती पाटील यांनी भारतमातेची प्रतिमा पुजन केले. कार्यक्रमास ज्यु.के.जी, सिनि.के.जी. व इ.१ ली ते ४ थीचे विद्यार्थी सहभागी झाले होते. इ.१ली ते ४ थीच्या विद्यार्थ्यांनी देशभक्तिपर गीत गाईले .शाळेचे मुख्याध्यापक यांनी प्रजासत्ताक दिनाचे महत्त्व विषद केले. अध्यक्षिय भाषणातून डॉ. तृप्ती पाटील यांनी विद्यार्थ्यांना राज्यघटनेचा सन्मान करुन आदर्श व्यक्तिमत्त्व होण्याच्या व प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. तसेच विद्यार्थ्यांनी आॕनलाईन क्लासेसच्या माध्यमातून आपला अभ्यास नियमीतपणे पुर्ण करत आहेत याबद्दल विद्यार्थ्याचे कौतुक केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नितेश वाघ यांनी केले. संपूर्ण कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक, समन्वयक, शिक्षकवृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.