धरणगाव, प्रतिनिधी । बापुसाहेब डी.आर.पाटील यांनी श्री.सावता माळी शिक्षण प्रसारक मंडळ, जळगांवची स्थापना करून त्या अंतर्गत महात्मा फुले हायस्कूल धरणगांव व एरंडोल या दोन ठिकाणी शाळांची मुहूर्तमेढ रोवली. या घटनेला ५० वर्ष पुर्ण होत असून याचे औचित्य साधून शाळेच्या आजी माजी शिक्षकांनी व विद्यार्थ्यांनी शाळेच्या नूतनीकरणसाठी भरावी मदत केली आहे.
१९७० ते २०२० असे ५० वर्ष या वटवृक्षाला होत आहे. या वटवृक्षाचे अनेक माजी विद्यार्थी केंद्र सरकार व राज्य सरकारच्या उच्च पदावर कार्यरत आहेत. सुवर्णमहोत्सवी वर्षात आजी – माजी शिक्षक, कर्मचारी व माजी विद्यार्थ्यांनी आपल्या स्वेच्छेने निधी जमा करण्यात सुरूवात केली. शाळेतील शिक्षक व कर्मचारी वृंद यांनी स्वतः हातात झाडू व खराटा घेतला व या शैक्षणिक वटवृक्षाची साफ – सफाई व देखभाल दुरुस्तीची कामे हाती घेतली. आजी – माजी शिक्षक , कर्मचारी व माजी विद्यार्थ्यांनी भरभरून प्रतिसाद दिला. त्यांनी ऑनलाईन माध्यमातुन शाळेतील शिक्षकांच्या अकाऊंटवर निधी टाकला. या निधीतुन शाळेचे नूतनीकरणाचे काम प्रगती पथावर आहे. यामध्ये शाळेचे माजी विद्यार्थी आबासाहेब मा.सी.के.पाटील यांनी संपूर्ण ऑफीस दत्तक घेऊन अंदाजे खर्च – ८० ,००० रुपयांत ऑफीस चे नूतनीकरण केले . यामध्ये दरवाजा , स्लायडींग खिडकी , POP वाटरप्रुप , रंगकाम , लाईट फिटिंग , फ्लोरींग , मार्बलचे काम केले आहे. माजी शिक्षीका प्रमिला सखाराम वाघ यांनी कै. सखाराम एका वाघ ( माजी मुख्याध्यापक रिंगणगांव ) यांच्या स्मरणार्थ २१ ,१११ रु. अशी भरीव देणगी दिली. तसेच माजी विद्यार्थी. संजय भगवान महाजन .( संचालक – वेदांत इंटरप्रायजेस , पुणे. ) कै. किशोर भगवान महाजन ( सिव्हील इंजिनियर ) यांच्या स्मरणार्थ २१ ,००० रु. अशी भरीव देणगी दिली. नगरसेवक तथा गटनेते कैलास माळी व चाळीसगांव शहरातील प्रसिद्ध बिल्डर सचिन पोपटराव महाजन यांच्याकडुन ११ , १११ रु.अशी भरीव देणगी दिली आहे. शाळेचे माजी मुख्याध्यापक एम.के. महाजन, एस.आर. महाजन, जे.ए.आहिरे तसेच शाळेचे माजी विद्यार्थी प्रा .सम्राट परिहार सर ( काँग्रेस जिल्हा सचिव ) ,. जीवन पाटीलर ( गं.स. संचालक व मुख्याध्यापक बालकवी विद्यालय ) तसेच शाळेतील उपशिक्षक- सामाजिक कार्यकर्ते – हॉटेल सिंधु गार्डन चे संचालक व्ही.टी. माळी या सर्वांकडुन शाळेच्या नुतनीकरणासाठी ५००० रु.भरीव देणगी देण्यात आली आहे. या सोबतच अनेक आजी – माजी शिक्षक , कर्मचारी वृंद शाळेच्या माजी विद्यार्थ्यानी रु. ५०० ते ३१०० पर्यंत निधी दिला आहे. माजी मुख्याध्यापक एम.के. महाजन , एस.आर. महाजन , प्रभारी मुख्याध्यापिका सौ. पी.आर. सोनवणे , तालुका गट शिक्षण अधिकारी ए.पी. बाविस्कर, शिक्षण विस्तार अधिकारी अशोक बिऱ्हाडे, सी.के.पाटील , प्रा.सम्राट परिहार , जीवन पाटील , केंद्र प्रमुख ज्ञानेश्वर माळी यांच्या मार्गदर्शनाखाली वाटचाल सुरू आहे.