जळगावात पोलिसांचे पथसंचलन

जळगाव प्रतिनिधी । आगामी निवडणुकीच्या पार्श्‍वभूमिवर आज सकाळी पोलीस प्रशासनाने शहरातून पथसंचलन (रूट मार्च ) केले.

लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू झाली आहे. महसूल प्रशासनाने आधीच मतदान यंत्राबाबत आधीच जनजागृती करण्यास प्रारंभ केला आहे. तर आता पोलीस प्रशासनाने कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी तयारी सुरू केली आहे. याच्या अंतर्गत आज शहरातून पथसंचलन करण्यात आले. शहरातील शाहू नगर व शिवाजी नगरसह गेंदालाल मील परिसरात हे पथसंचलन करण्यात आले. या पथसंचलनामध्ये शहर पोलीस स्थानकाच्या कर्मचार्‍यांसह गोपनीय शाखेचे कर्मचारी सहभागी झाले होते.

Add Comment

Protected Content