मेहरूण परिसरात मध्यरात्री बंद घर फोडले; ३६ हजाराचा ऐवज लंपास

जळगाव प्रतिनिधी । बंद घर फोडून घरातील सोन्याचे दागिने व रोकडसह ३६ हजाराचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना शहरातील मेहरूण येथे घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

पोलीसांकडून मिळालेली माहिती अशी की, मनोज मारूती घुले (वय-३८) रा.श्रीराम शाळेजवळ, मेहरूण हे आपल्या कुटुंबियासोबत २ जुलै २०२० रोजी सकाळी गेले. त्यावेळी घराला कुलूप लावून गेले होते. अज्ञात चोरट्यांनी बंद घर पाहून मध्यरात्री घरफोडी करून घरात ठेवलेले कपाट व लॉकर उघडून लॉकरमध्ये ठेवलेली २५ हजार रूपये किंमतीची १० ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी, १० हजार रूपये रोख व १ हजार रूपये किंमतीचे टायटन घड्याळ असे एकुण ३६ हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल लंपास केला. १० जुलै रोजी मनोज घुले घरी आल्यावर घराचा दरवाजाचे कुलूप उघडलेले दिसले व चोरी झाल्याचा प्रकार लक्षात आला. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ महेंद्रसिंग पाटील करीत आहे.

Protected Content