सांगली-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | सांगली जिल्ह्यातील इस्लामपूरचे नावाचे शहर आहे. या शहराचे नाव बदलण्याची मागणी भाजपचे आमदार नितेश राणे यांनी केली आहे. इस्लामपूरचे नाव बदलून ईश्वरपूर झालेच पाहिजे. अन्यथा आम्हाला दुकानांवरील इस्लामपूर नावांच्या पाट्या बदलाव्या लागतील. आता जास्त काळ दुकानावर इस्लामपूर शब्द राहणार नाही, असा इशारा नितेश राणे यांनी दिला आहे.
सांगलीच्या इस्लामपूरमध्ये नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली हिंदू जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला. छत्रपती शिवाजी चौकापासून यल्लमा देवी चौकापर्यंत निघालेल्या या जनआक्रोश मोर्चामध्ये हजारो हिंदू बांधव सहभागी झाले होते. यावेळी आयोजित सभेतून बोलताना नितेश राणेंनी बांगलादेशमधील हिंदूंवरील अत्याचाराचा निषेध नोंदवला. राज्यात आणि देशात लव्ह जिहाद कायदा करण्याची मागणी देखील त्यांनी यावेळी केली.