बाजार समितीचे माजी संचालक पुंजो पाटील कालवश : आज अंत्यसंस्कार

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक तथा राजकीय, सामाजिक व सहकार क्षेत्रातील मातब्बल पुंजो डिगंबर पाटील यांचे निधन झाले असून त्यांच्यावर आज अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

येथील यावल कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक, यावल नगर परिषदचे माजी नगरसेवक तथा भुसार धान्य खरेदी विक्रीचे प्रसिद्ध व्यापारी पुंजो डिंगंबर पाटील (वय ७३वर्ष ) यांचे काल दिनांक १० ऑक्टोंबर रोजी अल्पशा आजाराने निधन झाले.

आज दिनांक ११ ऑक्टोबर रोजी दुपारी ४ वाजता महाजन गल्ली परिसरातील त्यांच्या राहत्या घरून अंत्ययात्रा निघेल. पुंजो पाटील हे त्यांच्या मनमिळावु व हसमुख स्वभावामुळे ते शेतकरी व सामान्य नागरीकांमध्ये लोकप्रिय होते. त्यांच्या मृत्यु पश्चात पत्नी ,तिन मुले, एक मुलगी ,जावई, सुना, नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या मृत्यूमुळे परिसरावर शोककळा पसरली आहे.

Protected Content