ठाणे-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांना न्यायालयाने दिलासा देत अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे.
विनयभंग केल्याप्रकरणी जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून याचे व्यापक पडसाद देखील उमटत आहेत. दरम्यान, या प्रकरणी अटकपूर्व जामीन मिळावा म्हणून आव्हाड यांनी कोर्टात धाव घेतली असून यावर सुनावणी झाली. यात आव्हाड यांच्या वकिलांनी जोरदार युक्तीवाद केला. यासाठी त्यांनी संबंधीत महिलेचे काही जुने व्हीडीओज देखील सादर केलेत. आव्हाड यांनी त्या महिलेस वाईट हेतून स्पर्श केला नसल्याचा युक्तीवाद त्यांच्या वकिलांनी केला.
यानंतर दुपारी न्यायालयाने या प्रकरणी निकाल देतांना आमदार जितेंद्र आव्हाड यांना अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. यामुळे त्यांना या प्रकरणी दिलासा मिळाल्याचे मानले जात आहे. १५ हजारांच्या जातमुचलक्यावर जितेंद्र आव्हाड यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. न्यायमूर्ती प्रणय गुप्ता यांनी हा निर्णय दिला.