खुल्या व्हाईट लेदर बॉल टी-२० क्रिकेट स्पर्धेत भुसावळ आर. टी. स्वराज्य संघ विजेता

पाचोरा -लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । एन. एस. क्रिकेट क्लब व पाचोरा स्पोर्ट्स आयोजित खुल्या व्हाईट लेदर बॉल टी – २० क्रिकेट स्पर्धेत अंतिम सामना आर. टी. स्वराज्य (भुसावळ) व एन. एस. क्रिकेट क्लब (पाचोरा) यांच्यात रंगला. अतिशय चुरशीची या सामन्यात भुसावळच्या आर. टी. स्वराज्य संघाने ४ गडी राखून पाचोऱ्याच्या एन. एस. क्रिकेट क्लब संघावर विजय मिळविला.

पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष तथा मा. आमदार दिलीप वाघ, संस्थेचे चेअरमन संजय वाघ यांच्या सौजन्याने शहरातील शेठ मुरलीधरजी मानसिंगका महाविद्यालयाच्या प्रांगणावर दि. १ नोव्हेंबर पासुन खुल्या व्हाईट लेदर बॉल क्रिकेट लीग स्पर्धेचे आयोजन एन. एस. क्रिकेट क्लब व पाचोरा स्पोर्ट्स यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते. या लीग क्रिकेट स्पर्धेत एकुण १६ संघांनी सहभाग नोंदविला होता. आपल्या चांगल्या खेळाचे प्रदर्शन करत भुसावळच्या आर. टी. स्वराज्य संघ व पाचोऱ्याच्या एन. एस. क्रिकेट क्लब या दोन संघांनी अंतिम सामन्यात प्रवेश मिळविला. स्पर्धेचा अंतिम सामना दि. १४ नोव्हेंबर रोजी खेळविला गेला. या सामन्यात एन. एस. क्रिकेट क्लब संघाने प्रथम फलंदाजी करत आर. टी. स्वराज्य संघासमोर निर्धारित २० षटकात १६२ धावांचे आव्हान उभे केले होते.

मात्र आर. टी. स्वराज्य संघाचा कर्णधार रोहित तलरेजा व खालिद यांनी तुफान फटकेबाजी करत वैयक्तिक ५० धावा करत आपल्या संघास विजेतेपद मिळवुन दिले. तर एन. एस. क्रिकेट क्लब संघाचा अष्टपैलू खेळाडू रिजवान पठाण याची खेळी व्यर्थ ठरली असुन त्यांच्या संघास द्वितीय स्थानावर समाधान मानावे लागले. विजेत्या आर. टी. स्वराज्य संघास पाचोरा मतदार संघाचे आमदार किशोर पाटील व उद्योजक मुकुंद बिल्दीकर यांच्यातर्फे ४१ हजार रुपये रोख व ट्राॅफी, उपविजेत्या संघास एम. एस. पी. बिल्डकाॅनचे संचालक मनोज पाटील व पाचोरा पोलिस स्टेशनचे पोलिस काॅन्स्टेबल राहुल बेहरे (भैय्या) यांच्या तर्फे ३१ हजार रुपये रोख व ट्राॅफी, तर तृतीय पारितोषिक थेपडे बिल्डर्सचे संचालक अपुर्व थेपडे व नंदु शेलार युवा फाऊंडेशन यांच्यातर्फे ११ हजार रुपये रोख व ट्राॅफी देण्यात आली.

मन्याचा सामनाविर म्हणून रोहित तलरेजा यांचेसह मालिकावीर, उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट यष्टिरक्षक, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक अशी विविध पारितोषिके सुमित किशोर पाटील, एम. एस. पी. बिल्डकाॅनचे संचालक मनोज पाटील, आदित्य मुकुंद बिल्दीकर यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आले. ही स्पर्धा यशस्वीतेसाठी एन. एस. क्रिकेट क्लबचे अध्यक्ष नंदु शेलार, पाचोरा स्पोर्ट्सचे सुशांत जाधव, यांचेसह त्यांच्या संपूर्ण टिमने अथक परिश्रम घेतले.

 

 

Protected Content