रावेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | रावेर कृषी उपन्न बाजार समितीत झालेली नोकर भरतीची चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश जिल्हा उपनिबंधक संतोष बिडवई यांनी रावेर सहाय्यक निबंधक यांना दिले आहे.
रावेर कृषी उपन्न बाजार समितीमध्ये मागील महीन्यात नोकर भरती करण्यात आली.परंतु ही भरती चौकशीच्या फेर्यात अडकली आहे.येथील संचालक मंदार पाटील यांनी या नोकर भरती संदर्भात जिल्हा उपनिबंधक संतोष बिडवई यांच्याकडे लेखी तक्रार केली होती.या तक्रारीच्या अनुषंगाने जिल्हा उपनिबंधक संतोष बिडवई यांनी सहाय्यक निबंधक यानां पंधरा दिवसात चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहे.
दरम्यान, जिल्हा उपनिबंधकांनी नोकर भरतीचे आदेश दिल्यामुळे तालुक्याच्या सहकार व राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली असून या चौकशीतून नेमके काय समोर येणार याची उत्सुकता लागली आहे.