मधुमेहामुळे डोळ्यावर होणाऱ्या परिणाबाबत शहरातून काढली जनजागृती रॅली

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । महाराष्ट्र राज्य नेत्ररोग तज्ञ संघटना, जळगाव जिल्हा नेत्ररोग तज्ञ संघटना आणि जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या वतीने मधुमेहामुळे डोक्याच्या मागच्या पडद्यावर होणाऱ्या दुष्परिणाम संदर्भात नेरी नाका ते प्रभात चौकपर्यंत जनजागृती रॅली मंगळवारी २१ नोव्हेंबर रोजी सकाळी ८ वाजता काढण्यात आली.

महाराष्ट्र राज्य नेत्ररोग तज्ञ संघटना, जळगाव जिल्हा नेत्ररोग तज्ञ संघटना आणि जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या वतीने शहरातील प्रमुख भागातून जनजागृती रॅली मंगळवारी २१ नोव्हेंबर रोजी सकाळी ८ वाजता काढण्यात आली. ही रॅली नेरी नाका ते प्रभात चौक पर्यंत काढण्यात आली. या रॅलीला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर यांनी हिरवा झेंडा दाखवून सुरुवात केली. याप्रसंगी नेत्ररोग तज्ञ तथा अतिरिक्त वैद्यकीय अधीक्षक डॉ. धर्मेंद्र पाटील यांनी सूत्रसंचालन करीत मधुमेहाबद्दल उपस्थितांना माहिती दिली. जळगाव शहरातील व्हिट्रीओ रेटीनल सर्जन डॉ. निलेश चौधरी यांनी मागच्या पडद्यावर मधुमेहामुळे होणारे दुष्परिणाम कसे टाळता येतील यावर व्याख्यान दिले.

याप्रसंगी जळगाव जिल्हा नेतृत्व संघटनेचे अध्यक्ष डॉ. रागिनी पाटील, सचिव डॉ. चेतन पाटील, डॉ.अनुप येवले, उल्हास कोल्हे, डॉ. वृषाली पाटील, डॉ. नयना पाटील, डॉ. पंकज शहा यासह आदी उपस्थित होते. रॅली नंतर सर्वांना पुन्हा मधुमेहामुळे होणारे दुष्परिणाम याची मोफत तपासणी करण्याबाबत माहिती देण्यात आले.

Protected Content