मुंबई- अभिनेत्री कंगना राणावतने खोटा दावा लावला म्हणून तिच्याकडून या दाव्याचा खर्च वसूल करा, अशी मागणी महापालिकेच्या वतीने मुंबई हायकोर्टात करण्यात आली आहे.
अभिनेत्री कंगना राणावत हिच्या मालकीच्या बंगल्यात झालेल्या बेकायदेशीर बांधकामावर मुंबई महापालिकेने जी अंशतः कारवाई केली आहे त्याप्रकरणी कंगनाने महापालिकेवर दोन कोटी रुपयांचा दावा ठोकला आहे.
तथापि तिचा हा दावा फेटाळून लावा आणि खोटा दावा लावला म्हणून तिच्याकडून या दाव्याचा खर्च वसूल करा, अशी मागणी महापालिकेच्या वतीने मुंबई हायकोर्टात करण्यात आली आहे. या संबंधातील प्रतिज्ञापत्र महापालिकेने काल हायकोर्टात सादर केले. तिच्या याचिकेला कोणतेही महत्त्व देण्याची गरज नाही, असेही महापालिकेने म्हटले आहे.
मुंबई महापालिकेने 9 सप्टेंबर रोजी कंगनाच्या पालीहिल बंगल्यातील काही बांधकाम तोडले होते. ती पाडापाडी सुरू असतानाच तिने हायकोर्टात धाव घेतल्याने हे काम थांबवण्यात आले होते. या प्रकरणाची पुढील सुनावणी 22 सप्टेंबरला होणार आहे.