मुक्ताईनगर (प्रतिनिधी) येथील पंचायत समितीच्या गटसाधन केंद्राला महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक मंडळ नाशिकतर्फे दि 19 रोजी मोफत पाठ्यपुस्तके योजने अंतर्गत इयत्ता पहिली ते आठवी पर्यंतचे उर्दू व सेमी माध्यमची पुस्तके वगळून मराठी माध्यमाची पुस्तकं प्राप्त झाली आहेत.
गटशिक्षणाधिकारी विजय सरोदे यांनी दिलेल्या माहितीनुसार तालुक्यातील शाळांमधून विद्यार्थी संख्येनुसार पाठ्यपुस्तके मागवण्यात आली आहे. ही पाठ्य पुस्तके 30 मे पर्यंत तीन टप्प्यांमध्ये प्राप्त होणार आहेत. यातील पहिला टप्पा दिनांक 19 रोजी प्राप्त झाला असून यात पहिलीचे 2355 संचांमध्ये इंग्रजी, गणित, बालभारती तर इयत्ता दुसरीच्या 1890 संचमध्ये गणित, बालभारती, इंग्रजी इयत्ता तिसरीमधील 2140 संचमध्ये बालभारती, परिसर अभ्यास, इंग्रजी, गणित, इयत्ता चौथीच्या 2340 संचमध्ये इंग्रजी, गणित, बालभारती, परिसर अभ्यास इयत्ता पाचवीच्या 2419 संचमध्ये बालभारती,गणित,इंग्रजी परिसर अभ्यास हिंदी इयत्ता सहावी 2419 संचमध्ये बालभारती, इतिहास, गणित, भूगोल, सामान्य विज्ञान, हिंदी, इंग्रजी इयत्ता सातवीच्या 2426 संचमध्ये बालभारती, इतिहास, गणित, इंग्रजी, हिंदी, सामान्य विज्ञान, भूगोल इयत्ताा आठवीच्या 2551 संचमध्ये सुलभभारती, विज्ञान, गणित, इतिहास, नागरीक शास्त्र, इंग्रजी अशी एकूण 42395 पाठ्यपुस्तके प्राप्त झाली आहे. यावेळी प.स.सदस्य विकास पाटील यांनी पुस्तके उतरवण्या ठिकाणी भेट दिली. जिल्हास्तरावरून प्राप्त आदेशान्वये एम .एस.मालवेकर, वाय. बी. भोसले, मधुकर सैतवाल हे कर्मचारी यावेळी हजार होते.