Home आरोग्य दिलासादायक : जिल्ह्यात आज एकही बाधित रूग्ण आढळला नाही

दिलासादायक : जिल्ह्यात आज एकही बाधित रूग्ण आढळला नाही

0
121


जळगाव प्रतिनिधी । जिल्हा कोवीड रूग्णालयाने आज पाठविलेल्या कोरोना अहवालात दिवसभरात एकही बाधित रूग्ण आढळून आला नाही. तर एक रूग्ण बरा होवून घरी परतला आहे.  अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन.एस.चव्हाण यांनी एका प्रसिध्दीपत्रकान्वये दिली आहे.

 

जळगाव शहरातून आज एक बाधित रूग्ण आढळून आला आहे. जिल्ह्यात आजपर्यंत १ लाख ४२ हजार ७८८ बाधित रूग्ण आढळून आले. त्यापैकी १ लाख ४० हजार २०७ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. सध्या ४ बाधित रूग्ण विविध रूग्णालयात उपचार घेत आहे. यात २ हजार ५७७ रूग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन.एस.चव्हाण यांनी दिली आहे.


Protected Content

Play sound