भडगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । कोठली (तालुका भडगाव, जिल्हा जळगाव) येथील माजी सरपंच रविंद्र अभिमन्यू पाटील यांची महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी (OBC विभाग) च्या प्रदेश सरचिटणीस पदी निवड करण्यात आली आहे.
या निवडीचे पत्र अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या OBC विभागाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. अनिल जयहिंदजी (नवी दिल्ली) यांनी जारी केले आहे. ही नियुक्ती जळगाव जिल्हा काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष बाळासाहेब प्रदीपराव पवार, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि प्रदेश काँग्रेस कमिटीच्या OBC विभागाचे प्रदेशाध्यक्ष डॉ. यशपालजी भिंगे यांच्या विशेष शिफारशीवरून करण्यात आली आहे.

रविंद्र पाटील यांनी कोठली गावचे सरपंच म्हणून तसेच सामाजिक व राजकीय क्षेत्रात सातत्याने उल्लेखनीय कार्य केले आहे. त्यांच्या या कामाची दखल घेऊन पक्षाने त्यांच्यावर ही महत्त्वाची जबाबदारी सोपवली आहे.
त्यांच्या या नियुक्तीबद्दल भडगाव तालुक्यासह संपूर्ण जळगाव जिल्ह्यातून तसेच राजकीय, सामाजिक व विविध स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.



