मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | माजी मंत्री रवींद्र चव्हाण यांची भाजपच्या प्रदेश प्रभारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
निवडणुकीनंतर भाजपचे विद्यमान प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना महसूल मंत्रीपदासारखे अतिशय महत्वाचे खात्ो मिळाले असून रवींद्र चव्हाण यांना मात्र मंत्रीमंडळात स्थान मिळालेले नाही. यामुळे चव्हाण यांच्यावर लवकरच प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी येणार असल्याचे संकेत मिळाले होते. त्यांना तात्काळ हे पद मिळेल अशी अपेक्षा होती. या अनुषंगाने भाजपने काही महत्वाच्या नियुक्त्या जाहीर केल्या आहेत.
यात भाजपच्या प्रदेश प्रभारीपदी रवींद्र चव्हाण यांच्याकडे प्रदेश प्रभारी हे पद देण्यात आले आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांच्या स्वाक्षरीने ही नियुक्ती करण्यात आली आहे. यामुळे अजून काही दिवसांपर्यंत बावनकुळे यांच्याकडे प्रदेशाध्यक्षपद राहणार असल्याचे दिसून येत आहे. तर तूर्तास चव्हाण यांना प्रदेश प्रभारी या पदावर समाधान मानावे लागेल अशी शक्यता आहे. तर बावनकुळे यांच्या कडेच काही दिवस प्रदेशाध्यक्षपद राहिल अशी चर्चा आता सुरू झाली आहे.