रविकांत तुपकरांची मोठी घोषणा; नव्या पक्षाची केली स्थापना

बुलढाणा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | स्वाभिमानी शेतकरी संघटनेत अनेक वर्ष काम करणारे बडे नेते रविकांत तुपकर यांच्यावर पक्षाने निलंबनाची कारवाई केली आहे. पक्षांतर्गत मतभेदांमुळे ही कारवाई करण्यात आली आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष जालिंदर पाटील यांनी याबाबत घोषणा केली होती. त्यानंतर रविकांत तुपकर यांनी प्रतिक्रिया दिली. तर आज त्यांनी पुण्यात बैठक घेत नवीन संघटनेची स्थापन करण्याचा निर्धार केला आहे. तर विधानसभा निवडणुकीत आपण उतरणार असल्याचे देखील त्यांनी सांगितले.

रविकांत तुपकर यांची स्वाभिमानी शेतकरी संघटनेत निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. यानंतर रविकांत तुपकर यांनी नव्या संघटनेची घोषणा केली आहे. रविकांत तुपकर यांनी पुण्यात कार्यकर्त्यांसोबत बैठक घेतली. या बैठकीत आगामी विधानसभा निवडणुकीत २५ जागांवर निवडणूक लढवण्याचे ठरले. या बैठकीनंतर रविकांत तुपकर यांनी आपला पक्ष हा येत्या निवडणुकीत 25 जागांवर निवडणूक लढवणार, अशी घोषणा केली.

रविकांत तुपकर यांनी आपल्या पक्षाचे नाव महाराष्ट्र क्रांतिकारी आघाडी असे ठेवले आहे. त्यांनी आपल्या पक्षाच्या नावाची देखील घोषणा केली आहे. रविकांत तुपकर यांनी संघटना बुलढाणा जिल्ह्यात विधानसभेच्या 6 जागा लढवणार आहे. विशेष म्हणजे लवकरच राज्यव्यापी आंदोलनाची घोषणा करणार, असे रविकांत तुपकर यांनी म्हटले आहे. राज्यातील तिसरी आघाडी म्हणून विधानसभा निवडणूक लढवणार असे रविकांत तुपकर म्हणाले.

Protected Content