रावेर प्रतिनिधी । रावेर-यावल विधानसभा मतदारसंघात माजी आ. शिरीष चौधरी यांच्या जनसंवाद अभियानाला पातोंडी गावापासून दि ११ रोजी प्रारंभ करण्यात आला असून तेथील विनोद पाटील यांच्या निवासस्थानी जमलेल्या गावक-यांशी माजी आ. चौधरी यांनी संवाद साधला.
यासंदर्भात माहिती अशी की, माजी जिल्हा परिषद सदस्य रमेश पाटील, किसान सभेचे जिल्हाध्यक्ष सोपान पाटील, बाजार समितीचे संचालक डॉ. राजेंट पाटील, नीलकंठ चौधरी, पंचायत समितीचे सदस्य योगेश पाटील, चिमण धांडे, आर.के.चौधरी, गुणवंत टोगळे, कस तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन, किशोर पाटील, भानू मेद यांच्यासह पातोंडी येथील ग्रामस्थ युवक मोठ्या संख्येने उपस्थितीत होते.