Home Uncategorized रावेरात गुरांनी भरलेला ट्रक पोलीसांनी पकडला; ट्रकसह चार जणांना अटक

रावेरात गुरांनी भरलेला ट्रक पोलीसांनी पकडला; ट्रकसह चार जणांना अटक


रावेर प्रतिनिधी । मध्यप्रदेश नाक्यावर तपासणीत चकवा देवून बॅरीगेटला कट मारून गुरांनी भरलेला ट्रक रावेर पोलीसांनी ताब्यात घेतला आहे. ट्रकमधील गुरांची सुटका केली असून ट्रसह चार जणांना अटक करण्यात आली आहे. 

अधिक माहिती अशी की, मध्यप्रदेशाकडून महाराष्ट्रात येत असतांना ट्रक (पीबी ११ सीएल ९३०२) हा ट्रक रावेर मार्गे येत असतांना नाक्यावर तपासणीसाठी पोलीसांनी अडविला होता. दरम्यान चेकपोस्टला लावलेले बॅरीगेटला कट मारून सुसाट वेगाने रावेरच्या दिशने पळ काढला. याची माहिती  रावेर पोलीसांनी मिळताच पोलीस कर्मचारी यांनी कुसुंबा नजीक नाकाबंदी करून ट्रक ताब्यात घेतला आहे. ट्रकमधील ३० ते ४० गुरांची सुटका करण्यात आली आहे. याप्रकरणी रावेर पोलीसांनी चार जणांना अटक केली आहे. चारही जणांवर रावेर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


Protected Content

Play sound