उद्या रात्री ८ वाजेपासून अतिकडक लॉकडाऊन : हॉस्पीटल, मेडीकल सोडून आता सर्वच बंद (व्हिडिओ)

बुलढाणा, प्रतिनिधी । जिल्ह्यातील वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर थोड्या वेळापूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिगणे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत अतिकडक लॉकडाऊनच्या निर्णयावर शिक्कामोर्तब झाला आहे. 

जीवनावश्यक वस्तूंसाठीचा सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंतचा वेळ आता रद्द करण्यात आला आहे. भाजीपाला आणि किराणासाठी होम डिलेव्हरीचा पर्याय दिला गेला असून हॉस्पीटल आणि मेडीकल सोडून आता सर्वच काही बंद राहणार आहे. रस्त्यावर विनाकारण फिरण्यावर पूर्वीही बंदी होती. त्याची कडक अंमलबजावणी केली जाईल. दूधविक्रीला मर्यादित वेळ दिला जाण्याची शक्यता आहे.  १० दिवसांच्या कडक लॉकडाऊनचा आदेश जिल्हाधिकारी यांच्या वतीने जारी केला जाणार आहे. कडक लॉकडाऊन उद्या, सोमवार १०  मे रोजी सकाळपासून नव्हे तर रात्री ८ वाजेपासून राहणार, यात मात्र कुठलाही बदल होणार नाही. 

 

https://www.facebook.com/508992935887325/videos/1639451329589084

 

Protected Content