रावेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | महाराष्ट्र प्रदेश तेली महासंघाच्या रावेर तालुका कार्यकारणीची नवीन समिती नुकतीच जाहीर करण्यात आली. या निवड प्रक्रियेत ॲड. सुरज प्रकाश चौधरी यांची अध्यक्षपदी, तर अनिल बबन चौधरी यांची सचिवपदी निवड झाली आहे. ही घोषणा स्थानिक समाज बांधव आणि वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत करण्यात आली.
रावेर येथील बाबाजी लॉन्स येथे झालेल्या या कार्यक्रमाला जिल्हाध्यक्ष दत्तात्रय भाऊ चौधरी, सचिव अनिल पाटिल सर, मधुकर किसने देवरे, भगवान भाऊ सोनवणे, भागवत रामदास चौधरी आणि राजेंद्र फकिरा चौधरी हे मान्यवर उपस्थित होते. या संधीवर रावेर तालुका कार्यकारणी समितीची संपूर्ण यादी जाहीर करण्यात आली.
नवनिर्वाचित कार्यकारणीमध्ये उपाध्यक्षपदी ज्ञानेश्वर नारायण चौधरी, संजय अशोक चौधरी (सावदा) आणि अनिल तुळशीराम चौधरी (रसलपुर) यांची निवड झाली आहे. सहसचिव म्हणून संजय काशिनाथ चौधरी, कार्याध्यक्ष म्हणून अशोक शामराव चौधरी (रावेर), खजिनदार म्हणून सुनिल धनराज चौधरी आणि प्रसिद्धी प्रमुख म्हणून सुनिल हुकूमचंद चौधरी यांच्यासह अनेक सदस्यांचा समावेश आहे.
संघटक प्रमुख म्हणून मधुकर भागवत चौधरी (तांदलवाडी), प्रल्हाद केशव चौधरी (विवरा), नारायण शांताराम चौधरी (खानापूर), रमेश नामदेव चौधरी (रसलपुर) आणि प्रदीप अमृत चौधरी यांचीही निवड झाली आहे. इतर सदस्यांमध्ये सुभाष काशिनाथ चौधरी, वासुदेव प्रल्हाद चौधरी (रोझोदा), सुनिल मोहन चौधरी, दिनेश नथ्थू चौधरी, अजय दगडू चौधरी (सावदा), सचिन अशोक पाटिल (खानापूर), शांताराम काशिनाथ चौधरी, हेमंत अशोक चौधरी (सावदा), प्रवीण संतोष चौधरी (पुनखेडा), प्रशांत वामन चौधरी (पुनखेडा) आणि देविदास बुधो चौधरी यांचा समावेश आहे.