जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | जळगाव जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री अंकित यांची बदली झाली असून त्यांची छत्रपती संभाजी नगर येथे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आले आहे. त्यांच्या जागी जळगाव जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी श्रीमती मीनल करनवाल यांचे नियुक्ती करण्यात आली आहे.
राज्य शासनाकडून आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात येत आहे. यात विविध विभागातील अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात येत आहे. या अनुषंगाने राज्यातील काही आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्याचे आदेश काढण्यात आले आहे. आज काढलेल्या आदेशात जळगाव जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री अंकीत यांची बदली छत्रपती संभाजीनगर येथील जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्याच्या जागी आता नांदेड येथील जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती मीनल करनवाल यांची जळगाव येथील जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारीपदी नियुक्त करण्यात आले आहे. असे आदेश मंगळवारी १८ मार्च रोजी सायंकाळी काढण्यात आले आहे.