Home Uncategorized ‘त्या’ शाखा व्यवस्थापकाला अटक करा : निळे निशाण संघटनेची मागणी

‘त्या’ शाखा व्यवस्थापकाला अटक करा : निळे निशाण संघटनेची मागणी

0
42

रावेर प्रतिनिधी | युवतीवर अत्याचार करून तिच्या लहान भावास मारहाण करून मोबाईल हिसकावणारा खानापूर येथील बँकेचा तत्कालीन व्यवस्थापक नितीन शेंडे याला अटक करावी अशी मागणी निळे निशाण या संघटनेने केले असून या संदर्भात महिला पदाधिकार्‍यांनी निवेदन दिले.

तालुक्यातील एका युवतीवर अत्याचार करणार्‍या तसेच तिच्या लहान भावाला मारहाण करून मोबाईल हिसकावणार्‍या खानापूर सेंट्रल बँकेच्या तात्कालिन शाखा व्यवस्थापक नितीन शेंडे याला अटक करावी, या मागणीसाठी निळे निशाण सामाजिक संघटनेच्या महिला पदाधिकार्‍यांनी पोलीस प्रशासनाला निवेदन दिले आहे. नितीन शेंडे याने अत्याचार पीडित युवतीच्या भावाला मारहाण करून मोबाईल हिसकावून घेतला होता. त्यानंतर तो साथीदारासह त्याच्या वाहनातून (क्रमांक एमएच.१९-सीझेड.२९२९) रावेरकडे गेला होता. शेंडे यांच्यापासून पीडित युवती व तिच्या भावाच्या जीवाला धोका आहे. पोलिसांनी त्यांना तत्काळ अटक करावी, अशी मागणी निळे निशाण सामाजिक संघटनेच्या महिला अध्यक्षा नंदा बाविस्कर, इंदुबाई हिवरे, अलकाबाई पारधी, हसिना तडवी, व शबीना तडवी यांनी एपीआय शीतलकुमार नाईक यांच्याकडे निवेदनातून केली.


Protected Content

Play sound