रावेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | रावेरचे वनक्षेत्रपाल अजय बावणे यांना जळगाव येथे वनविभागा अंतर्गत आयोजित स्पर्धेत गोळाफेक या प्रकारात गोल्ड मेडल मिळाले आहे.
नुकत्याच वनविभागा अंतर्गत विविध क्रीडा स्पर्धेच आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धा दि १७ व १८ फेब्रुवारी रोजी धुळे प्रादेशिक वनसंरक्षण दिगंबर पगार आणि उपवनसंरक्षक विवेक होशिंग यांच्या मार्गदर्शना खाली वन क्रीडा स्पर्धा उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव येथे आयोजित करण्यात आल्या होत्या.
यात जळगाव, यावल, धुळे,नंदुरबार,मेवासी,सामाजिक वनीकरण जळगाव संचलन धुळे वन्यजीव यावल एकूण आठ विभागांचा समावेश होता. यामध्ये यावल वन विभागाकडून सहायक संरक्षक प्रथमेश हाडपे यांच्या नेतृत्वात यावल क्रिकेट टीमने उपविजेते पद पटकावले. तर रावेर वनक्षेत्रपाल अजय बावणे यांना गोळा फेक क्रीडा स्पर्धेत गोल्ड मेडल मिळाले.वनपाल सारिका कदम बॅडमेटन सिंगल मध्ये सुवर्णपदक तर वनरक्षक बाजिराव बारेला यांना शंभर मीटर मध्ये सिल्वर मेडल पटकावले.
पारितोषिक वितरण आयपीएस रावले,उपवणसंरक्षक मेवासी लक्ष्मण पाटील, उपवनसंरक्षक जळगाव विवेक होशिंग यांच्या हस्ते जळगावात करण्यात आले. या यशाबद्दल अजय बावणे यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.