रावेर – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । आगामी रमजान ईद व अक्षय तृतीया सण नागरीकांनी एकोप्याने साजरे करावे. उपद्रवी लोकांपासून सावधान रहावे. शांतता प्रस्थापित करावी असे आवाहन करत भडकाऊ पोष्ट करणाऱ्यांवर पोलीस प्रशासन कारवाई केल्याशिवाय राहणार नाही असा इशाराही फैजपूर उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. कुणाल सोनवणे यांनी रोजे ईप्तार पार्टीत केला.
रावेर पोलीस स्टेशनतर्फे सर्व धर्म समभाव ईप्तार पार्टीचे नागझिरी परिसरात आयोजन केले होते. या वेळी व्यासपिठावर मौलाना गयासुद्दिन, ऋषिकेश महाराज, मौलाना नजर, मौलाना शकिल,कपिल महाजन पोलिस निरिक्षक कैलास नागरे सह पोलिस निरिक्षक शितलकुमार नाईक उपस्थित होते. याप्रसंगी अनेक मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले.
यावेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष पद्माकर महाजन, माजी नगर सेवक आसिफ मेंबर, राष्ट्रवादी शहराध्यक्ष महेमुद शेख, कॉग्रेस उपाध्यक्ष संतोष पाटील गयास शेख, यूसुफ खान, बाळु शिरतुरे, अॅड योगेश गजरे, पंकज वाघ, भावलाल महाजन, असदउल्ला खान, दिलीप पाटील, शब्बीर सर, सावन मेढे, धुमा तायडे, गयासुद्दीन काझी, शेख सादीक, शेख रफीक आदी हिन्दू-मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.