हार्ट ऑफ गोल्ड : धर्म-जात विसरून मुस्लिम बांधवांनी केले हिंदू कोरोना मृत वृध्दाच्या देहावर अंत्यसंस्कार !

जळगाव प्रतिनिधी । कोरोनाच्या आपत्तीने माणुसकीची अनेक उदाहरणे आपल्या समोर आलेली आहेत. याच प्रकारे कोल्हापूर येथील बैतुलमाल कमिटीने जात-धर्माच्या पलीकडे जात हिंदू वृध्दाच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करून माणुसकीचे दर्शन घडविले आहे.

बैतुलमाल कमिटी

कोल्हापुर

कोरोना चा कहर पहा.. त्याची भीती पहा… कोल्हापूरच्या स्मशानात एका संध्याकाळी शववाहिका एका मृत कोरोना पेशंटला आणते. सोबत असलेल्या नातेवाईकांपैकी कोणीही बॉडी ला उतरविण्यासाठी पुढे येत नव्हते इतकचं काय तर पोटचा मुलगा ही बापाच्या पार्थिवाचे लांबूनच दर्शन घेऊन अंत्यसंस्कार होण्याआधीच निघून गेला.

आता प्रश्‍न होता अंत्यसंस्कार करणार कोण? आणि त्यावेळी तिथे बैतुलमाल कमिटीचे मुस्लिम बांधव उपस्थित होते त्यांना गोष्ट कळाली… त्यांनी पुढाकार घेतला, जाती पाती ला विसरून माणुसकीचा धर्म पाळत पुढे आले. पीपीई कीट घालून त्या ७८ वर्षीय कोरोना मृताचे अंत्यसंस्कार संपन्न केले.

या कार्यात श्री जाफर बाबा मलबारी, राजू नदाफ आणि अश्फाक नायकवडी या बैतुलमाल कमिटीच्या सदस्यांचा सहभाग होता. त्यांनी राजश्री शाहूमहाराज यांचा समतेचा, माणुसकीचा विचार जागृत ठेवला असे बोलले तर वावगे ठरणार नाही.

बैतुलमाल कमिटी सारख्या अशा सर्व माणुसकी या धर्मावर विश्‍वास ठेवणार्‍या संस्थांना मानाचा सलाम!

( अशाच प्रकारे कोरोनाच्या प्रतिकारासाठी झटणार्‍या कोरोना योध्द्यांना जळगावातील ख्यातनाम अशा रतनलाल सी. बाफना ज्वेलर्सतर्फे हार्ट ऑफ गोल्ड या मालिकेच्या माध्यमातून वंदन केले जात आहे. ही मालिका आपण लाईव्ह ट्रेंडस न्यूजवरून देखील वाचू शकतात. )

अधिक माहितीसाठी

फेसबुक पेज : https://www.facebook.com/RCBafnaJewellers

इन्स्टाग्राम अकाऊंट : https://www.instagram.com/rcb_jewellers

Protected Content