हार्ट ऑफ गोल्ड : सोनवणे कुटुंबातील चौघे सदस्य कोरोना बाधीतांच्या सेवेत !

शेअर करा !

जळगाव । येथील योगशिक्षिका हेमांगिनी सोनवणे या आपले डॉक्टर पती आणि शासकीय सेवेत असणार्‍या दोन मुलांच्या मदतीने अहोरात्र कोरोना बाधीतांची सेवा करत आहेत. एखादे संपूर्ण कुटुंबच कोविडग्रस्तांच्या सेवेत असल्याचे हे अतिशय अनोखे उदाहरण आहे.

एक डॉक्टर, एक योगशिक्षिका, एक समुपदेशक तर एक प्रशासकीय अधिकारी…
सोनवणे कुटुंबातील चार सदस्य कोरोना रुग्णाच्या सेवेत…

सौ. हेमांगिनी सोनवणे व कुटुंब
योगाशिक्षिका व आहार तज्ज्ञ, जळगाव

सोनवणे कुटुंबातील ज्येष्ठ सदस्य आणि प्रमुख आधारस्तंभ डॉ. संजय लक्ष्मण सोनवणे वयाच्या साठीत धरणगाव येथे वैद्यकीय अधिकारी म्हणून दिवस-रात्र कोरोना बाधितांसाठी आपली सेवा देत आहेत. उपचारा सोबत समुपदेशनाचे कार्य ही करीत आहेत. डॉक्टरांच्या पत्नी योगशिक्षिका सौ. हेमांगिनी सोनवणे या जळगाव येथील कोविड केअर सेंटरला जाऊन कोरोना पॉझिटिव्ह आणि विलगीकरण केलेल्या रुग्णांचे समुपदेशन करून त्यांना योगाचे धडे देत आहे. इतकच नाहीतर त्यांची रोगप्रतिकारक शक्ती वाढवी म्हणून त्यांना प्राणायाम, आहार व निसर्गोपचारद्वारा सेवा देत आहे. यासोबत त्यांनी श्‍वसन मंत्राचे व्हिडिओ यूट्यूब वर सर्वांसाठी उपलब्ध केले आहेत.

सोनवणे कुटुंबातील जेष्ठ चिरंजीव गोवा येथे अभियंता आहेत. तेही आर्ट ऑफ लिविंगच्या संस्थेमार्फत कोरोना रुग्णांसाठी समुपदेशन आणि स्वयंसेवक म्हणून सेवा देत आहे.त्यांचेच लहान बंधू डॉ. सौरभ सोनवणे २०१७ च्या बॅचचे आयएएस अधिकारी असून स्वतः एमबीबीएस आहे. सध्या ते मध्यप्रदेशात प्रशासकीय सेवे बरोबर स्वतः कॉरोना पेशंट ला तपासून वैद्यकीय सेवा ही देत आहेत.

खरंच सोनवणे कुटुंबाचं समर्पण आज प्रत्येकासाठी एक आदर्श ठरले आहे.सोनवणे कुटुंब व त्यासारख्या सर्व कोरोना योद्ध्यांना कुटुंबांना मानाचं वंदन!

( अशाच प्रकारे कोरोनाच्या प्रतिकारासाठी झटणार्‍या कोरोना योध्द्यांना जळगावातील ख्यातनाम अशा रतनलाल सी. बाफना ज्वेलर्सतर्फे हार्ट ऑफ गोल्ड या मालिकेच्या माध्यमातून वंदन केले जात आहे. ही मालिका आपण लाईव्ह ट्रेंडस न्यूजवरून देखील वाचू शकतात. )

अधिक माहितीसाठी

फेसबुक पेज : https://www.facebook.com/RCBafnaJewellers

इन्स्टाग्राम अकाऊंट : https://www.instagram.com/rcb_jewellers

आम्हाला फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!