विधानसभेत मविआ २२५ जागा जिंकेल – शरद पवार

लातूर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | विधानसभेला महायुतीचा पार सुपडाच साफ होईल, महाविकास आघाडीला विधानसभेत २८८ पैकी २२५ जागेवर यश मिळेल, असा विश्वास देखील राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी व्यक्त केला. सुधाकर भालेराव यांच्या पक्षप्रवेशाच्या सोहळ्यात शरद पवार बोलत होते.

शरद पवार पुढे बोलताना म्हणाले की, लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने महायुतीला कात्रजचा घाट दाखवलेला आहे. महायुतीचे पानीपत होईल याचा स्वप्नात सुद्धा कोणी विचार केला नसेल. राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील बड्या नेत्यांनी विचार केला नव्हता. पण राज्यातील जनतेने महाविकास आघाडीच्या पारड्यात मतं टाकून शिंदे-फडणवीस-पवार या त्रिमुर्तीला जोरदार झटका दिला. तर आता महाविकास आघाडीतील नेत्यांमध्ये सत्तर हत्तींचं बळ आले आहे. विधासभेला महायुतीचा सुपडाच साफ होईल, असा विश्वास शरद पवार यांनी व्यक्त केला.

Protected Content