चंदूअण्णा नगरात स्थानिक नागरीकांचे रास्ता रोको आंदोलन (व्हिडीओ)

जळगाव प्रतिनिधी । शहरातील चंदूअण्णा नगर परिसरात गेल्या २० वर्षांपासून गटारी नसल्यामुळे दुर्गंधी पसरून नागरीकांचे आरोग्य धोक्यात आल्याने संतप्त झालेल्या नागरीकांनी आज तब्बल दोन तास रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी महापौर जयश्री महाजन आणि उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी भेट देवून लवकरच गटारींचे काम मार्गी लावण्याचे आश्वासन दिले.

सविस्तर माहिती अशी की, वार्ड क्रमांक ९ अर्थात चंदू अण्णानगर परिसरात गेल्या २० वर्षांपासून घरांची वस्ती आहे. हा भाग जळगाव महापालिकेच्या अंतर्गत असूनही अद्यापपर्यंत या परिसरात गटारी आणि रस्त्यांचा प्रश्न प्रलंबित आहे. दरम्यान याच भागात मोठे भक्ती अपार्टमेंट मधील मलमुत्राचे पाणी व इतर सांडपाणी चंदूअण्णानगरात येते. दरम्यान येथे गटारी नसल्यामुळे हे सांडपाणी आणि इतर पाणी रस्त्यावर येवून मोठ्या प्रमाणावर दुर्गंधी होत आहे. आणि या दुर्गंधीतून परिसरात डेंग्यू व मलेरीया आजाराचे रूग्ण वाढलेले आहे. गेल्या २० वर्षांपासून वारंवार जळगाव महापालिकेला निवेदनही देण्यात आले. स्थानिक नगरसेवक लता भोईटे, डॉ. चंद्रशेखर अत्तरदे, मनोज चौधरी आणि प्रतिभा पाटील यांच्याकडे देखील याबाबत तक्रारी दिल्यात. परंतू आश्वासन देवून वेळ मारून नेण्यात आले आहे. आज गुरूवारी १२ ऑगस्ट रोजी सकाळी ९.३० वाजता स्थानिक रहिवाशी यांनी आक्रमक पवित्रा घेत रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. 

रास्ता रोको होत असल्याची माहिती महापौर जयश्री महाजन आणि उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी आंदोलन कर्त्यांशी भेट घेवून चर्चा केली. गटारीच्या समस्या तातडीने मार्गीच्या लागवण्याचे निर्देश महापौर जयश्री महाजन यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले.   हे आंदोलन सकाळी ९.३० वाजेला सुरूवात करण्यात आली. दुपारी १२ वाजता महापौर जयश्री महाजन व उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.यावेळी स्थानिक रहिवाशी संजय बडगुजर, मनोज सोनवणे, जयेश भगत, रामचंद्र साळुंखे, प्रणित पाटील, हर्षल पाटील, अडॅ.शरद न्हायदे, विनोद पाटील, रमेश पाटील, हर्षल महाजन, राकेश लोखंडे, संतोष बडगुजर, फेकरीकर काका यांच्यासह चंदू अण्णा नगरातील स्थानिक रहिवाशी यांची मोठी गर्दी होती. 

 

Protected Content