पारोळ्यात शेतकरी संघटनेचा रास्ता रोको आंदोलन

पारोळा – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पारोळा कृषि कार्यालयातील रिक्त असलेल्या विविध पदे त्वरीत भरण्यात यावे, या मागण्यांसाठी शेतकरी संघटनेच्या वतीने शिवतीर्थ समोरील राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको व ठिय्या आंदोलन करण्यात आले. दरम्यान चार दिवसांच्या आत रिक्त पदे भरण्याच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

पारोळा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या हितासाठी पारोळा कृषी कार्यालयातील रिक्त असलेल्या तालुका कृषी अधिकारी, सहायक कृषी अधिकारी व इतर रिक्त पदे त्वरित भरण्यात यावे असे शेतकरी संघटनेच्या वतीने वेळोवेळी निवेदन देऊन देखील दखल घेण्यात आली नाही. म्हणून करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली असे मत बाळासाहेब पाटील यांनी व्यक्त केले. शेतकरी संघटनेने आंदोलन मागे घ्यावे यासाठी जिल्हा उप कृषी अधिकारी जाधवर व तालुका कृषी अधिकारी वारे यांनी स्वत: आंदोलन स्थळी भेट देत रिक्त असलेल्या पदांपैकी चार पदे ही त्वरीत चार दिवसाच्या आत भरण्यात येतील असे आश्वासन दिले व उर्वरित पदे ही टप्प्याटप्प्याने भरण्यात येतील असे पत्र कृषी विभागाने दिले.

दरम्यान, दिलेले आश्वासन कृषी विभागाने वेळीच पाळले नाही तर शेतकरी संघटनेच्या वतीने पुन्हा तिव्र स्वरुपाचे आंदोलन करण्यात येईल, अशा इशारा देत डॉ.पृथ्वीराज पाटील यांनी आंदोलन स्थगित करण्याची घोषणा करत आंदोलन मागे घेतले.

याप्रसंगी बाळासाहेब पाटील, भडगाव तालुका शेतकरी संघटनेचे अध्यक्ष अभिमन हटकर, शहर उपाध्यक्ष मनोज परदेशी, अमळनेर तालुका शेतकरी संघटना उपाध्यक्ष नरेश चौधरी, पाचोरा जागृत जनमंचचे अध्यक्ष निलंकठ पाटील, उपाध्यक्ष गुलाब पाटील, कमांडो ईश्वर मोरे, राकेश वाघ, छावा संघटनेचे तालुकाध्यक्ष विजय पाटील, दौलतराव नाना, पिरणकुमार अनुष्ठान, उमेश नाना, रामराव पाटील, भिम आर्मी संघटना तालुका प्रमुख जितेंद्र वानखेडे यांच्यासह आदी उपस्थित होते.

 

Protected Content