नशिराबाद-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तलाठी ऑफीसमध्ये काम करणाऱ्या शिपायाने सात वर्षाच्या बालिकेचा विनयभंग केल्याची घटना जळगाव खुर्द गावात घडली आहे. याबाबत सोमवारी ५ सप्टेंबर रोजी दुपारी नशिराबाद पोलीस ठाण्यात शिपायावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव खुर्द येथील सात वर्षीय मुलगी आपल्या आजीसह वस्तव्याला आहे. १० जून रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास आजी ह्या सातवर्षीय मुलीसोबत जळगाव खुर्द येथील तलाठी कार्यालयात कामानिमित्त आल्या होत्या. तलाठी कार्यालयात तलाठी मॅडम नसल्यामुळे आजी ह्या नातीसोबत थोडा वेळ थांबल्या. नंतर मुलीला तहान लागल्याने पाणी घेण्यासाठी बाहेर गेल्या असता तलाठी कार्यालयातील शिपाई भैय्या (पुर्ण नाव माहित नाही) याने मुलीचा विनयभंग केला. मुलगी ही रडत रडत आजी कडे गेल्यावर तिने हा प्रकार सांगितला. अखेर दोन महिन्यानंतर सोमवारी ५ सप्टेंबर रोजी दुपारी ३ वाजता आजीने दिलेल्या तक्रारीवरून तलाठी कार्यालयातील शिपाई भैय्या याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल मोरे करीत आहे.