पैश्यांसाठी विवाहितेचा छळ; पतीसह तिघांवर गुन्हा

जळगाव प्रतिनिधी । माहेरुन पैसे आणावे यासाठी सासरच्या मंडळींकडून विवाहितेचा मानसिक व शारीरिक छळ केल्याप्रकरणी नशिराबाद पोलिस ठाण्यात सासरच्या मंडळींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, जळगाव तालुक्यातील नशिराबाद येथील माहेरवाशीन परवीन बी आशीक शहा (वय ३०) यांचे भुसावळ येथील काझी प्लॉट परिसरातील आशीक शहा उस्मान पटवे यांच्यासोबत २००६ मध्ये विवाह झाला होता. लग्नाच्या दोन महिन्यांपासून विवाहेने माहेरुन पैसे आणावे यासाठी तिचा छळ केला जात होता. यावेळी या विवाहितेच्या वडीलांनी त्यांना २५ हजार रुपये देखील दिले होते. परंतु त्या विवाहितेचा तरी देखील छळ सुरु होता तसेच तिचा मुलगी झाली म्हणून तिला मारहाण करीत शिवीगाळ देखील केली जात होती. नेहमी होणार छळ असह्य झाल्याने विवाहितेने नशिराबाद पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. याप्रकरणी पती आशीक शहा उस्मान पटवे, जेठानी रेहानाबी सलीम शहा पटवे, रजीयानी मुजफ्फर शहा पटवे रा. जाम मोहल्ला यांच्यासह सासरच्या मंडळींविरुद्ध नशिराबाद पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास गजानन देशमुख हे करीत आहे.

Protected Content