जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । दुचाकीवरुन गुटख्याची वाहतुक करणाऱ्या एका तरूणाला जिल्हापेठ पोलिसांनी पकडले. ही कारवाई शनिवारी सकाळच्या सुमारास रिंगरोड परिसरात केली. त्याच्याकडून १ लाख ११ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आला असून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जळगाव शहरातील रिंगरोड परिसरात जिल्हापेठ पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी प्रवीण पाटील, कैलास शिंदे हे शनिवारी १३ जानेवारी रोजी सकाळच्या सुमारास पेट्रोलिंग करीत होते. यावेळी त्याठिकाणाहून राज्यात प्रतिबंधित असलेला गुटख्याची मुकेश डालर रायसिंग (वय-३७, रा. संगम सोसायटी, रिंगरोड) हा तरुण (एमएच १९ सीडी ०२७७) वरुन वाहतुक करत होता. पेट्रोलिंग करणाऱ्या पोलिसांनी संशयिताची चौकशी तपासणी केली. यावेळी त्या दुचाकीस्वाराने हा माल शहरातील वसंतशेठ यांच्याकडून घेतला असल्याचे चौकशीत सांगितले. तसेच त्याच्याजवळ सुमारे ३६ हजारांचा गुटख्यासह ७५ हजारांची दुचाकी असा एकुण १ लाख ११ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी मुकेश रायसिंग याच्याविरुद्ध जिल्हापेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.