घरात कुणी नसल्याची साधली संधी; महिलेनं उचललं टोकाच पाऊल !

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील उमर कॉलनीत राहणाऱ्या ५३ वर्षीय व्यक्तीने राहत्या घरात गळफास घेवून जीवनयात्रा संपविल्याची घटना शनिवारी १३ जानेवारी रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास उघडकीला आले आहे. याप्रकरणी सायंकाळी ७ वाजता शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मुनवराबी शेख अशरफ (वय ५३, रा. उमर कॉलनी, जळगाव) असे मयत झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.

याबाबत अधिक असे की, जळगाव शहरातील उमर कॉलनीत मुनवराबी शेख अशरफ या आपल्या कुटुंबियांसह वास्तव्यास होत्या. गेल्या अनेक दिवसांपासून त्या आजारी असल्याने त्यांच्यावर उपचार सुरु होते. दरम्यान, शनिवारी १३ जानेवारी रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास घरात कुणीही नसतांना त्यांनी गळफास घेवून आपली जीवनयात्रा संपविली. ही घटना त्यांच्या कुटुंबियांच्या लक्षात येताच त्यांनी घटनेची माहिती शहर पोलिसांना दिली. त्यानुसार सहाय्यक फौजदार संजय झाल्टे यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर पंचनामा करुन मुनवराबी यांचा मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. याठिकाणी वैद्यकीय अधिकारी सीएमओ डॉ. निरंजन देशमुख यांनी तपासणी करीत मयत घोषीत केले. याप्रकरणी सायंकाळी ७ वाजता शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Protected Content