सावदा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । रामनवमी ते हनुमान जन्मोत्सवानिमित्त १६ एप्रिल ते २३ एप्रिल दरम्यान श्रीराम कथा व श्री हनुमान याग (पंचकुंडी महायज्ञ)चे भव्य दिव्य सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. यासंदर्भात २८ मार्च रोजी गुरूवार रोजी दुपारी ४ वाता महामंडलेश्वर श्री जनार्दन हरीजी महाराज यांच्या उपस्थितीत पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.
रामनवमी ते हनुमान जन्मोत्सवानिमित्त १६ एप्रिल ते २३ एप्रिल दरम्यान श्रीराम कथा व श्री हनुमान याग (पंचकुंडी महायज्ञ)चे भव्य दिव्य सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. यासंदर्भात आज महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज यांच्या उपस्थितीत सोहळ्याच्या पुर्वनियोजनाबाबत पत्रकार परिषदेचे आयोजन करयात आले आहे. हा सोहळा बोदवड तालुक्यातील शिरसाळा येथील जय श्री हनुमान मंदिर ट्रस्ट व ग्रामस्थांच्या वतीने आयोजीत करण्यात आला आहे. तरी सर्व भाविक भक्तांनी व परिसरातील सर्व वारकरी सांप्रदायातील महाराज मंडळी, सार्वजनिक र्दुर्गोत्सव मंडळ, सार्वजनिक गणपती मंडळ, भजनी वारकरी, संप्रदायातील टाळकरी मंडळी, सर्व विविध फाऊंडेशनचे संचालक व टीम विविध संस्थांचे कर्मचारी स्वयंसेवक पदाधिकारी व पंचक्रोशीतील ग्रामस्थ मंडळी सामाजिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवर सर्व जेष्ठ मंडळी व्यापारी संघटना मेडीकल असोसिएशन डॉक्टर असोसिएशन वकील संघ असोसिएशन सर्व पत्रकार/सोशल मिडियाचे विविध न्युज चॅनलचे/ बांधव यांनी या बैठकीत उपस्थित या राहत संत दर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.