चाकूचा धाक दाखवत व्यापाऱ्याला लुटण्याचा प्रयत्न करणाऱ्याला अटक; एमआयडीसी पोलीसांची कारवाई

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील नेहरू नगरात दुचाकीने ने जात असलेल्या व्यापाराची दुचाकी अडवून चाकूचा धाक दाखवत स्कुटीला लावलेले पैशांची बॅग हिसकावून जबरी चोरी करण्याचा प्रयत्न केल्याची घटना मंगळवार २६ मार्च रोजी रात्री ९.३० वाजता घडली. या प्रकरणातील संशयित आरोपीला एमआयडीसी पोलिसांनी बुधवार २७ मार्च रोजी सकाळी ११ वाजता अटक केली, त्याच्यावर एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या संदर्भात अधिक माहिती अशी की, ओम गोपाल चुघरा रा. नेहरू नगर, जळगाव हे आपल्या परिवारासह वास्तव्याला असून चहा पावडरचा व्यापार करून ते आपला उदरनिर्वाह करत असतात. मंगळवार २६ मार्च रोजी रात्री ९.३० वाजता ओम सुधरा हे त्यांची स्कुटी (एमएच १९ डीएन ७८२९) ने घरी नेहरू नगरात जात असतांना संशयित आरोपी गौरव खुशाल जयस्वाल वय-२० रा. नाथवाडा जळगाव याने व्यापाऱ्याची दुचाकी आडवून चाकूचा धाक दाखवत स्कुटीला लावलेली पैशांची बॅग हिसकावून जबरी चोरी करण्याचा प्रयत्न केला होता. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान गुन्हा दाखल झाल्यानंतर एमआयडीसी पोलिसांनी संशयित आरोपी गौरव जयस्वाल याला नाथवाडा परिसरातून अटक केली. त्याच्यावर एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला .

शेअर मार्केटमध्ये पैसे गमावल्याने केला चोरीचा प्रयत्न !
दरम्यान गौरव जयस्वाल हा याच व्यापाऱ्याकडे दोन वर्षांपूर्वी कामाला होता ऑनलाईन शेअर मार्केटमध्ये पैसे गमावल्याने त्याला आलेल्या आर्थिक अडचणीमुळे त्याने जबरी चोरी करण्याचा प्रयत्न केल्याचे निष्पन्न झाले आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, उपविभागीय पोलिस अधिकारी संदीप गावित, एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय पोटे, सहायक फौजदार अतुल वंजारी, पोहेकॉ किरण पाटील, चंद्रकांत पाटील, साईनाथ मुंडे, रवी पाटील यांनी केली आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार संशयित आरोपीला कारागृहात सर्वांनी केली आहे.

Protected Content