पत्रकारितेच्या माध्यमातून समाजाला योग्य दिशा दाखविण्याचे कार्य – रमेश परदेशी

WhatsApp Image 2020 01 07 at 5.17.22 PM

एरंडोल, प्रतिनिधी | पत्रकारितेच्या माध्यमातून समाजाला योग्य दिशा दाखविण्याचे कार्य होत असते व पत्रकार हे देशाच्या लोकशाहीचा चौथ खांब मनाला जात असल्याचे प्रतिपादन नगराध्यक्ष रमेश परदेशी यांनी केले.

 सोमवार ६ जानेवारी एरंडोल नगर पालिकेत पत्रकार दिन साजरा करण्यात आला.  याप्रसंगी  नगराध्यक्ष रमेश परदेशी बोलत होते. याप्रसंगी उपनगराध्यक्ष नितीन चौधरी व नगरसेवक प्रा.मनोज पाटील,योगेश महाजन, नितीन महाजन आदी उपस्थित होते. नगराध्यक्ष रमेश परदेशी यांनी पुढे बोलतांना सांगितले की, पत्रकार हा समाजाला योग्य दिशेला नेण्याचे कार्य करीत असल्यामुळे त्यांचे लिखाण हे वास्तव असले पाहिजे. याप्रसंगी नगरसेवक व नगरपालिकेचे कर्मचारी उपस्थित होते. सूत्रसंचालन बबलू ठाकुर यांनी तर आभार अशोक मोरे यांनी मानले.

आस्था महिला मंडळातर्फे पत्रकारांचा सत्कार

शहरातील आस्था महिला मंडळातर्फे आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ महिला चंद्रकला जैन ह्या होत्या. तर प्रमुख पाहुणे म्हणुन माजी नगराध्यक्ष किशोर निंबाळकर, बद्रीसिंग परदेशी, जिल्हा पत्रकार संघाचे कार्याध्यक्ष प्रमोद पाटील, मंगला घोडके, दमयंती ठक्कर आदी उपस्थित होते. प्रास्ताविक आरती ठाकूर यांनी केले तर सुत्रसंचालन नंदा शुक्ला यांनी तर आभार पायल ठाकुर यांनी मानले. यावेळी मिनाक्षी पाटील, ज्योती भागवत, निशा ठक्कर, देवी परदेशी, शालिनी कोठावदे आदी तर मनोहर ठाकुर, बाबूलाल माळी, चंद्रभान पाटील, भाऊसाहेब पाटील, संजय बागड, डॉ. प्रशांत पाटील, शेलेश चौधरी, आदी पत्रकार व मान्यवर उपस्थित होते.

शहरातील डॉक्टर पिता पुत्रांतर्फे पत्रकारांचा सत्कार

डॉ. पी. जी. पिंगळे यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम होऊन तालुक्यातील सर्व पत्रकारांचा सत्कार डॉ.मकरंद पिंगळे व त्यांचे वडील डॉ.पी.जी.पिंगळे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचलन किशोर मोराणकर यांनी तर आभार शालिनी कोठावदे यांनी मानले. प्रास्ताविक मकरंद पिंगळे यांनी केले. यावेळी संजय बागड, रोहिदास पाटील, जिल्हा पत्रकार संघाचे कार्याध्यक्ष प्रमोद पाटील, एरंडोल तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष बी. एस. चौधरी, शहराध्यक्ष कैलास महाजन, जावेद मुजावर, कुंदन ठाकुर, राजु ठक्कर, सुधीर शिरसाठ, पंकज महाजन, रतीलाल पाटील, आबा महाजन, डॉ.प्रशांत पाटील तसेच तालुक्यातील पत्रकार उपस्थित होते.

तालुका पत्रकार संघातर्फे स्व.बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती साजरी

एरंडोल तालुका पत्रकार संघातर्फे आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंती निमित्त तालुका पत्रकार कार्यालयात कार्यक्रम घेण्यात आला. अध्यक्षस्थानी जिल्हा पत्रकार संघाचे कार्याध्यक्ष प्रमोद पाटील हे होते. प्रमुख पाहुणे म्हणुन तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष बी. एस. चौधरी, शहराध्यक्ष कैलास महाजन, सचिव संजय बागड, पत्रकार जावेद मुजावर, पंकज महाजन, सुधीर शिरसाठ, रोहिदास पाटील, कुंदन ठाकुर, राजु ठक्कर, आबा महाजन, रतीलाल पाटील, चंद्रभान पाटील, किशोर मोराणकर, डॉ. प्रशांत पाटील व तालुका पत्रकार संघाचे सर्व सदस्य उपस्थित होते.

Protected Content