कोरपावली येथे थकबाकी भरल्याने पाणीपुरवठ्याची वीजतोडणीची कारवाई टळली

यावल प्रतिनिधी । तालुक्यातील कोरपावली येथील पाणी पुरवठ्याची थकबाकी असल्याने महावितरणाकडून वीजतोडणीची कारवाई करण्यात आली. तथापि, ग्रामपंचायतीचे उपसरपंच हमीदाबी पटेल यांनी स्वखर्चातुन महावितरणाचे १० हजार रुपयांची थकबाकी भरल्याने वीजतोडणीची कारवाई तात्पुर्वी टळली आहे.  

याबाबत महावितरणाचे धांडे हे ग्रामपंचायतीच्या पाणीपुरवठा केन्द्रावरील विद्युत कनेक्शन तोडणीच्या कारवाईसाठी आले असता, कोरपावली गावाच्या नवनियुक्त उपसरपंच हमिदाबी पटेल यांच्या पुढाकाराने त्यांचे ज्येष्ठ चिरंजीव व सामाजीक कार्यकर्ते मुक्तार पटेल यांनी लागलीच बँकेत जाऊन तात्काळ १० हजार रुपये आणून अधिकाऱ्यांकडे भरणा केल्याने ग्रामपंचायतवर ओढणारे संकट टळले आहे. आपल्या गावचे पाणीपुरवठ्याचे वीज कनेक्शन तोडणी होण्यापासून वाचवल्याने त्यांचे विशेष कौत्तुक सरपंच विलास अडकमोल व सर्व सदस्यांसह ग्रामस्थांच्या वतीने करण्यात येत आहे. या आदी देखील उपसरपंच हमीदाबी पटेल यांनी अनेक वर्षापासुन प्रलंबीत असलेल्या कुपनलीकेचा प्रश्न देखील स्वता: स्वखर्चाने एक लाख रुपये खर्च करून पिण्याच्या पाण्याचा प्रश्न देखील मागील पंधरवाड्यात मार्गी लावण्यात यश मिळवले. दरम्यान ग्रामपंचायतची कर वसुली मोहीम कोरोना संकटकाळामुळे मंदावल्याने सद्याच्या परिस्थितीला उपसरपंच हमीदाबी पटेल यांनी पुढाकार घेवुन केलेले गावाचे कार्य हे लक्ष वेधणारेच आहे.

 

Protected Content