जळगाव रेल्वे माथाडी कामगार संघनेचा आंदोलनाचा इशारा

जळगाव, लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | जळगाव रेल्वे माथाडी कामगार संघटनेतर्फे विविध मागण्या करण्यात आल्या आहेत. त्या मागण्या मान्य न झाल्याचा निषेधार्थ प्रशासनाच्या विरोधात रविवार दि. १ मे कामगार दिनी काम बंद आंदोलन करून निषेध नोंदवण्यात येणार असल्याचे युनियनचे अध्यक्ष मुकेश बाविस्कर यांनी कळविले आहे.

जळगाव रेल्वे माथाडी कामगार संघटनेच्या वतीने दि. २६ जानेवारी रोजी विविध मागण्यांचे निवेदन कामगार राज्यमंत्री बच्चू कडू व पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांना देण्यात आले होते. त्या अनुषंगाने मंत्रालयात दोन्ही मंत्री महोदय यांच्या उपस्थित २२ फेब्रुवारी २०२२ रोजी बैठकीत कामगार सह आयुक्त यांनी सर्व मागण्या प्रशासनातर्फे मान्य करण्याचे लेखी आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले होते. त्यावेळी सदर आंदोलन स्थगित करून कामगारांनी प्रशासनावर विश्वास दाखवला होता. परंतु, तीन महिने उलटूनही एकही मागणी मान्य न झाल्याने कामगारांनी बैठक बोलावून दि. १ मे कामगार दिनी काम बंद आंदोलन करून निषेध नोंदवणार आहेत. सदर बैठकीत युनियनचे अध्यक्ष मुकेश उर्फ आबा बाविस्कर, सचिव राजू भाट, लहू हटकर, भिकान शेख, संतोष हटकर, जोंटी हटकर आदी पदाधिकारी व कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Protected Content